शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
3
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
4
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
5
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
6
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
7
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
8
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
9
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
10
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
11
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
12
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
13
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
14
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
15
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
16
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
17
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
18
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
19
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
20
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
Daily Top 2Weekly Top 5

काश्मीरमध्ये पर्यटन व्यवसाय शून्यावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2019 05:14 IST

टॅक्सी मालक त्रस्त : पर्यटक नसल्याने शेकडो वाहने जागच्या जागीच; व्यवसायासाठी घेतलेले कर्ज थकले

श्रीनगर : काश्मीरमधील पर्यटन व्यवसायाला मोठा फटका बसलेला आहे. मोहम्मद सुलतान (४७) हे टॅक्सीचे मालक असले तरी सध्या काळजीत पडले आहेत. कारण त्यांनी नवी टोयोटा क्रिस्टा कार खास पर्यटन व्यवसायासाठी १९ लाख रुपयांना विकत घेतली तरी गेल्या महिनाभरापासून त्यांना व्यवसाय मिळालेला नाही.

जुलै महिन्यात अमरनाथ यात्रा सुरू व्हायच्या तोंडावर कार त्यांनी घेतली ती काही व्यवसाय होईल या आशेने. सुलतान यांनी १० लाख रुपये स्वत:कडील उभे केले व राहिलेले बँकेकडून कर्ज घेतले. व्यवसायच नसल्यामुळे गेल्या दोन महिन्यांत मी बँकेचा मासिक १८ हजार रुपयांचा कर्जहप्ताही फेडू शकलेलो नाही, असे ते म्हणाले.

आपली सगळी स्वप्ने पर्यटन व्यवसाय ऐन भरात असताना एका फटक्यात जमिनीवर येईल याची त्यांना किंचितही कल्पना नव्हती. अमरनाथ यात्रा कळसाकडे असताना जम्मू आणि काश्मीरला विशेष दर्जा दिलेले घटनेतील अनुच्छेद ३७० रद्द केल्याची बातमी आली आणि काश्मीरमधील अर्थव्यवस्था जागच्या जागी थबकली. मी कर्जफेड करू शकलो नाही हा माझ्यासाठी मोठा तोटाच आहे. गेल्या २५ वर्षांपासून मी या व्यवसायात आहे; परंतु अशी वाईट परिस्थिती मी कधी पाहिली नव्हती. कोणत्याही सामान्य दिवशी मी तीन हजार रुपयांपेक्षा जास्त कमाई करतो; परंतु अनुच्छेद ३७० रद्द झाल्यापासून एक रुपयादेखील कमाई झालेली नाही, असे सुलतान यांनी सांगितले.टॅक्सी ठप्पचच्या परिस्थितीला तोंड देणारे सुलतान हे एकटे नाहीत. येथील बोलव्हार्ड टुरिस्ट टॅक्सी स्टँडवर अशा २०० टॅक्सीज आहेत. सध्या त्यांना काही कामच नाही. च्बरेच टॅक्सीमालक आणि चालक या क्षणाला बेरोजगार आहेत. त्यांना खोऱ्यातील परिस्थिती लगेचच सामान्य होईल याबद्दल शंका आहे. या टॅक्सी स्टँडचा रोजचा व्यवसाय पाच लाख रुपयांचा असतो, तो आज शून्यावर आला आहे.

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरtourismपर्यटनArticle 370कलम 370