शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
2
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
3
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
4
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
5
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
6
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
7
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
8
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
9
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
10
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
11
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
12
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
13
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
14
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
15
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
16
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
17
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
18
‘साहेब’ होऊ घातलेला बिरदेव म्हणतो, शेळ्या-मेंढ्यांना काय लाजायचं? तीच माझी ताकद
19
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
20
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे

असंही मताधिक्य... भाजपाच्या 'या' उमेदवाराचा फक्त 181 मतांनी विजय 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2019 17:19 IST

भाजपाचा एक उमेदवार असा आहे की, जो फक्त 181 मतांनी जिंकला आहे. 

नवी दिल्ली : यंदाच्या लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या लाटेत विरोधी पक्षांचा सुपडा साफ झाला आहे. अनेक नेत्यांवर डिपॉजिट जप्त होण्याची वेळ आली आहे. भाजपाचे काही उमेदवार पाच लाखांहून अधिक मतांनी निवडून आले आहेत. मात्र, भाजपाचा एक उमेदवार असा आहे की, जो फक्त 181 मतांनी जिंकला आहे. 

उत्तर प्रदेशातील मछली शहर मतदारसंघात भाजपाचे उमेदवार भोलानाथ आणि बसपाचे उमेवार त्रिभुवन राम यांच्यात अटीतटीचा सामना रंगला होता. काल मतमोजणी सुरु झाल्यापासून ते संपेपर्यंत जसजशी आकडेवारी समोर येईल, तसतशी या निवडणुकीत कोण बाजी मारणार, याबाबत कार्यकर्त्यांमध्ये चलबिचल सुरू होती. अखेर भाजपाच्या भोलानाथ यांनी आघाडी घेत 181 मतांनी त्रिभुवन राम यांचा पराभव केला. 

या निवडणुकीत भाजपाचे उमेदावार भोलानाथ यांना 488397 मते मिळाली. तर बसपा उमेदवार त्रिभुवन राम यांच्या पारड्यात 488216 मते पडली. तर, गेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपाच्या राम चरित्र निषाद यांनी 1.75 लाखांहून अधिक मतांनी विजय मिळविला होता. याचप्रमाणे, अंदमान निकोबार मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार कुलदीप राय शर्मा यांनी भाजपाच्या विशाल जॉली यांचा केवळ 1407 मतांनी पराभव केला.

दुसरीकडे, लक्षद्वीपमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे मोहम्मद फैजल यांनी 823 मतांना काँग्रेसचे उमेदवार हमदुल्ला सईद यांच्यावर मात केली. झारखंडमधील खुंटी मतदारसंघात भाजपाच्या अर्जुन मुंडा यांनी काँग्रेसचे कालीचर मुंडा यांचा 1145 मतांनी पराभव केला. याशिवाय, पश्चिम बंगालमध्ये सुद्धा अशा कमी फरकाने उमेदवार जिंकले आहेत. येथील आरामबाम मतदारसंघात तृणमूल काँग्रेसचे अफरीन अली 1142 मताधिक्याने विजयी झाले. त्यांनी भाजपाच्या तपन कुमार रॉय यांचा पराभव केला.  

टॅग्स :Uttar Pradesh Lok Sabha Election 2019उत्तरप्रदेश लोकसभा निवडणूक निकाल 2019Lok Sabha Election 2019 Resultsलोकसभा निवडणूक निकालLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९machhlishahr-pcमखलीशहर