शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! उद्धव ठाकरेंसह २ प्रमुख नेते 'शिवतीर्थ'वर दाखल; मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची घेतली भेट
2
एकीकडे मोदींना 'मित्र' म्हणायचं तर दुसरीकडे 'हे' पाऊल उचलायचं; ट्रम्पचा नेमका 'प्लॅन' काय?
3
Video - परिस्थिती भीषण! जे दिसलं, ते सर्वच लुटलं... नेपाळमध्ये Gen-Z आंदोलनकर्त्यांचा धुडगूस
4
नेपाळच्या माजी पंतप्रधानांना पत्नीसह बेदम मारले; जमावाच्या तावडीतून सैन्यानं कसं वाचवले?
5
iPhone 17: भारत, दुबई, अमेरिका की इतर कुठे; कोणत्या देशात आयफोन १७ मिळतोय स्वस्त? वाचा
6
जीएसटी कपातीच्या तोंडावर TVS NTORQ 150 लाँच; नव्या रुपात आली हायपर स्पोर्ट्स स्कूटर
7
सगळ्यात स्वस्त ७ सीटर असणाऱ्या 'या' कारची किंमत ९६ हजारांनी झाली कमी! आता कितीला मिळणार?
8
'मुंबईत घर घेणं आम्हाला परवडत नाही'; ८१ टक्के लोकांचं स्पष्ट मत, सर्वेक्षणात काय म्हटलंय? 
9
'हॉटेल जाळले, लोक पर्यटकांनाही सोडत नाहीत'; नेपाळमध्ये अडकलेल्या भारतीय महिलेने सांगितली आपबिती
10
फेसबुक, इन्स्टाग्राम की ट्विटर सर्वाधिक कमाई नेमकी कुठून होते? जाणून घ्या सविस्तर
11
आलिशान कार, ३२ किलो सोन्या-चांदीची बिस्किटं, दागिने; काँग्रेस आमदाराकडे कोट्यवधींचं घबाड
12
दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई, देशभरातून ९ संशयित ISIS दहशतवादी ताब्यात!
13
पोलिसांना पाहताच उठून उभा राहिला पाण्यात पडलेला मृतदेह, व्हिडीओ काढणारे झाले अवाक्
14
HDFC Bank च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! 'या' दिवशी ९० मिनिटांसाठी बंद राहणार UPI सेवा, जाणून घ्या
15
दुधाचे भाव कमी होणार! अमूल-मदर डेअरीचे दूध किती रुपयांनी स्वस्त होणार? कंपनीकडून निर्णयाचं स्वागत
16
राहा फिट! वेट लॉससाठी व्हायरल होतंय ६-६-६ वॉकिंग चॅलेंज; बारीक होण्याचा सुपरहिट फॉर्म्युला?
17
भुजबळ म्हणाले, "हैदराबाद गॅझेटचा जीआर रद्द करा", विखे पाटलांनी दिलं उत्तर, म्हणाले "रद्द करण्याची गरज नाही"
18
वीज बिलाची चिंता सोडा, पिकांना भरपूर पाणी द्या; उपसा योजनांच्या वीज सवलतीस २ वर्षे मुदतवाढ
19
बाप बडा न भैया, सबसे बडा रुपैया! जमिनीच्या वाटणीसाठी मृतदेह २ दिवस ठेवला घरात
20
Raja Raghuvanshi : सोनम बेवफा! "तो जिवंत आहे की मेला?", राजा रघुवंशीचा काटा काढल्यावर पत्नीने विचारलेला प्रश्न

जम्मू-काश्मीरचा एकूण खर्च २०१४ ते २०१९ मध्ये वाढला, कॅगने संसदेत सादर केला अहवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2021 06:42 IST

जम्मू-काश्मीरचा २०१४ मध्ये असलेला ३४,५५० कोटी रुपयांचा खर्च २०१९ मध्ये वाढून ६४,५७२ कोटी रुपयांपर्यंत गेला अहे, असे भारताचे नियंत्रक व महालेखा परीक्षक (कॅग)ने म्हटले आहे. या एकूण खर्चात महसुली खर्चासह इतर खर्चाचा समावेश आहे.

जम्मू : जम्मू-काश्मीरचा २०१४ मध्ये असलेला ३४,५५० कोटी रुपयांचा खर्च २०१९ मध्ये वाढून ६४,५७२ कोटी रुपयांपर्यंत गेला अहे, असे भारताचे नियंत्रक व महालेखा परीक्षक (कॅग)ने म्हटले आहे. या एकूण खर्चात महसुली खर्चासह इतर खर्चाचा समावेश आहे.३१ मार्च २०१९ रोजी संपलेल्या वर्षासाठी कॅगने सामाजिक, सामान्य, आर्थिक व महसुलावर आपला अहवाल सादर केला आहे. त्यात म्हटले आहे की, २०१८-१९ साठी १,११,८५० कोटी रुपयांचा अर्थसंकल्पीय अंदाज होता व व्यय ९५,३८६ कोटी रुपये होता. हे आकडे २०१४मध्ये क्रमश: ५३,८९७ कोटी व ६२,२९६ कोटी रुपये होते. संसदेत नुकत्याच सादर करण्यात आलेल्या या अहवालात म्हटले आहे की, २०१५-१६ रोजी अर्थसंकल्पीय अंदाज व वास्तविक व्यय क्रमश: ६२,७२६ कोटी रुपये व ७९,२८१ कोटी रुपये होता. हेच आकडे २०१६-१७ मध्ये क्रमश: ८०,४६५ कोटी व ८५,०८४ कोटी रुपये होते. २०१७-१८मध्ये क्रमश: ८९,९३९ कोटी व ८९,६२४ कोटी रुपये होते.  कॅगने म्हटले आहे की, २०१४ ते २०१९मध्ये जम्मू-काश्मीरचा एकूण व्यय ३४,५५० कोटी रुपयांवरून वाढून ६४,५७२ कोटी रुपये झाला, तर महसुली खर्च २९,३२९ कोटी रुपयांवरून ९१ टक्के वाढून ५६,०९० कोटी रुपये झाला. वर्ष २०१८-१९ मध्ये जम्मू-काश्मीर सरकारची एकूण आवक मागील वर्षीच्या तुलनेत ५.६ टक्के वाढली आहे. 

मॉडेल स्कूल न उघडल्याची जबाबदारी निश्चित करावीnजम्मू-काश्मीरमध्ये ४४.१३ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध असूनही मागील १० वर्षांत मॉडेल स्कूल न उघडण्याची बाब गांभीर्याने घेऊन हा निधी परत करणे तसेच याला कोण जबाबदार आहे, हे निश्चित करण्यास कॅगने सांगितले आहे.nशिक्षण विभागाच्या केंद्राकडून मिळालेला निधी वेळेत न वापरल्यामुळे लाभार्थी गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळण्यापासून वंचित राहिले आहेत. हे प्रकरण मे २०२०मध्ये विभाग, सरकारकडे पाठविण्यात आले आहे. याबाबत त्यांच्या उत्तराची अपेक्षा आहे. हा निधी व्याजासह परत केला जावा व मॉडेल स्कूल स्थापित न करण्याची जबाबदारी निश्चित करावी.

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरCentral Governmentकेंद्र सरकार