लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार
By admin | Updated: February 11, 2015 00:33 IST
लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार
लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार
लग्नाचे आमिष दाखवून अत्याचारनागपूर : लग्नाचे आमिष दाखवून सलग ६ महिने एका युवतीवर अत्याचार करणाऱ्या आरोपी युवकाविरुद्ध प्रतापनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. बुलडाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यातील तेल्हारा येथील आरोपी विशाल रुस्तुम कुटे हा आणि पीडित युवती प्रतापनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत सोबत काम करीत होते. आरोपी युवकाने या युवतीला लग्नाचे आमिष दाखवून मे २०१४ ते ऑक्टोबर २०१४ या काळात तिच्यावर अत्याचार करून तिला गरोदर केले. त्यानंतर युवतीने लग्नाची मागणी केल्यानंतर आरोपीने लग्न करण्यास नकार देऊन पीडित युवतीला जातिवाचक शिवीगाळ केली. या प्रकरणी प्रतापनगर पोलिसांनी आरोपी युवकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.