शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

सीमेवरचा सर्वांत उंच तिरंगा झाला नामुश्कीचा विषय!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2017 01:33 IST

येथून जवळच असलेल्या पाकिस्तानच्या अट्टारी सीमेजवळ चार महिन्यांपूर्वी मोठ्या दिमाखात उभारण्यात आलेला देशातील सर्वांत उंच राष्ट्रध्वज ‘नामुश्की’चा विषय झाला असून, येत्या स्वातंत्र्यदिनी तो तिरंगा फडकेल का? याविषयी साशंकता आहे.

अमृतसर : येथून जवळच असलेल्या पाकिस्तानच्या अट्टारी सीमेजवळ चार महिन्यांपूर्वी मोठ्या दिमाखात उभारण्यात आलेला देशातील सर्वांत उंच राष्ट्रध्वज ‘नामुश्की’चा विषय झाला असून, येत्या स्वातंत्र्यदिनी तो तिरंगा फडकेल का? याविषयी साशंकता आहे.१२० फूट लांब आणि ८० फूट रुंदीचा हा तिरंगा ३६० फूट उंच ध्वजस्तंभावर ५ मार्चला फडकविण्यात आला. हा राष्ट्रध्वज पाकिस्तानमधूनही दिसतो म्हणून तो अभिमानाचा विषय ठरला होता. अट्टारी सीमेवर रोज सायंकाळी भारत व पाकिस्तानच्या सीमा सैनिकांचा होणारा ‘चेंज आॅफ गार्ड’ पाहण्यासाठी येणाºया पर्यटकांचेही तो आकर्षण ठरला होता. परंतु सोसाट्याच्या वाºयाने हा राष्ट्रध्वज तीन वेळा फाटला. एकदा उच्चदाबाच्या वीजवाहक तारांमध्ये अडकला आणि तो पूर्ववत करेपर्यंत परिसरातील गावांचा वीजपुरवठा बंद ठेवावा लागला. फाटका ध्वज फडकविणे हा गुन्हा असल्याने तो कायमचा खाली उतरविण्यात आला. तो उभारण्यासाठी ३.५ कोटी रुपयांचा खर्च झाला होता. फाटलेला ध्वज दुरुस्त करून पुन्हा फडकविण्यासाठी १ लाख रुपयांहून अधिक खर्च येतो. आत्तापर्यंत सहा लाख रुपये खर्च झाले आहेत.अमृतसरचे उपआयुक्त कमलदीप सिंग संघा यांनी पंजाब सरकारच्या गृह विभागाला कळविले की, राष्ट्रध्वज उतरवावा लागणे ही ‘नामुश्की’ आहे. ध्वज डौलाने फडकत राहील यासाठी मार्ग काढावा! राज्य सरकारला अद्याप तोडगा सापडलेला नाही. (वृत्तसंस्था)