शहरं
Join us  
Trending Stories
1
"लाज वाटू द्या, गिधाडांनो !"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावला, पोलिसांची दडपशाही (video viral)
2
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
3
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
4
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
5
ब्रायन लाराचा ४०० धावांचा विक्रम थोडक्यात बचावला, फलंदाज ३६७ धावांवर नाबाद असताना घडलं असं काही...  
6
“ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदींना दोन ओळी मराठी बोलता येत नाही”; शिंदेसेनेची टीका
7
राहा फिट! वजन कमी करण्यासाठी अत्यंत प्रभावी ठरतं 'पिरॅमिड वॉक'; पण 'ते' आहे तरी काय?
8
'पंचायत'च्या विनोदने 'या' मराठी अभिनेत्रीसोबतही केलंय काम, सिनेमाची आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चा
9
“हेच मराठी, महाराष्ट्राचे मारेकरी, हिंदूंनाही वाचवू शकत नाही”; उद्धव ठाकरेंचा भाजपावर पलटवार
10
…तेव्हा अवघ्या २ मतांनी पराभव, आता ४ वर्षांनी बदललं नशीब, पुनर्मतमोजणीत बाजी मारून बनल्या सरपंच  
11
“महात्मा गांधींचे विचार देशाची दिशा, सत्य; पुतळ्यावर वार करून संपणार नाही”: हर्षवर्धन सपकाळ
12
सेन्सेक्स-निफ्टी सपाट! पण, अंबानींच्या 'या' कंपनीच्या शेअर्समध्ये धडाकेबाज वाढ! कोणत्या क्षेत्रात घसरण?
13
"संजय शिरसाट यांच्या मुलाची मालमत्ता शून्य, मग त्यांनी हॉटेल विकत कसं घेतलं?" अंबादास दानवेंचा सवाल
14
सरकारी बँकांमध्ये खातं असेल तर हे वाचाच; मिनिमम बॅलन्सवरील दंडाबाबत मोठी अपडेट
15
वंदे भारत ट्रेन पुराच्या पाण्यात अडकली; सात तास, रेल्वे इंजिन आले आणि...
16
मुंबईच्या क्रिकेट संघाला पृथ्वी शॉचा राम राम, आता या संघाकडून खेळणार
17
पाकिस्तान सांगत राहिले, राफेल पाडले, राफेल पाडले...! अमेरिकेच्या F-१६ माजी पायलटने सांगितले काय घडले...
18
"नवोदित कलाकारांनाही इथे...", मराठी अभिनेत्याची 'चला हवा येऊ द्या'साठी पोस्ट, निलेश साबळेंबद्दल म्हणाला...
19
चमत्कार! पाकिस्तानात हिंदू कुटुंबातील २० जणांचा मृत्यू; ३ महिन्यांची चिमुकली बचावली
20
Vastu Shastra: अंघोळ झाल्यावर करत असाल 'ही' एक चूक तर घरात भरेल नकारात्मक ऊर्जा!

उद्या सांगाल लोकांच्या बोटात गडबड, मिश्रांचा केजरीवालांवर पलटवार

By admin | Updated: May 9, 2017 18:56 IST

आम आदमी पक्षानं दिल्ली विधानसभेत उचललेल्या ईव्हीएम मशिनमधल्या छेडछाडीच्या मुद्द्याचा कपिल मिश्रांनी खरपूस समाचार घेतला

ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. 9 - आम आदमी पक्षानं दिल्ली विधानसभेत उचललेल्या ईव्हीएम मशिनमधल्या छेडछाडीच्या मुद्द्याचा कपिल मिश्रांनी खरपूस समाचार घेतला आहे. उद्या अरविंद केजरीवालांचा आम आदमी पक्ष लोकांच्या बोटांमध्येही गडबड असल्याचंही सांगेल, असं म्हणत मिश्रांनी केजरीवालांसह आपवर टीकास्त्र सोडलं आहे. निवडणुकीत विजय न मिळाल्यानं लोकशाहीवर टीका करणं चुकीचं आहे. भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून लक्ष हटवण्यासाठीच आपकडून ईव्हीएमचा मुद्दा पुढे केला गेला आहे, असा आरोपही मिश्रा यांनी केला आहे. आपच्या सौरभ भारद्वाज यांनी एका प्रात्यक्षिकाद्वारे ईव्हीएम मशिनशी छेडछाड करणं शक्य असल्याचं दाखवलं होतं. त्यावर कपिल मिश्रा म्हणाले, या देशातील निवडणूक प्रक्रिया जगभरात पाहिली जाते. आमच्या देशात निवडणुकीला एक इभ्रत आहे. आम आदमी पार्टी एकही निवडणूक जिंकू शकत नाही. आता केजरीवालांच्या नावावर एकही मत मिळत नाही. आम आदमी पार्टीनं एश्टच्या माध्यमातूनच निवडणुका जिंकल्या आहेत. केजरीवाल आम आदमी पार्टीची इभ्रत वाचवण्यासाठीच असे प्रकार करत असल्याचंही मिश्रा म्हणाले आहेत.(भ्रष्टाचाराच्या मुद्द्याला बगल देत आपनं उठवला ईव्हीएमचा मुद्दा)आपच्या अलका लांबा यांनी ईव्हीएमवरून भाजपावर जोरदार टीका केली आहे. त्या म्हणाल्या, ज्या राज्यात फ्रीजमध्ये बीफ ठेवल्यानं एकाची हत्या केली जाते, तिथे ईव्हीएमवर संशय का घेतला जाऊ शकत नाही. आपच्या नेत्यांनी ईव्हीएम टॅम्परिंगसंदर्भात तीनदा माहिती मागवली होती. मात्र निवडणूक आयोगानं त्यांना काहीच प्रत्युत्तर दिलं नाही. दिल्लीच्या महापालिका निवडणुकीत जनरेशन थ्री मशिन असतानाही जनरेशन वनच्या मशिनी वापरण्यात आल्या आहेत. अल्का म्हणाल्या, निवडणूक आयोगाकडे पर्याप्त ईव्हीएम मशिन असतानाही राजस्थानमधून ईव्हीएम मशिन मागवाव्या लागल्या आहेत. तसेच सीसीटीव्ही कॅमेरे खराब करून या ईव्हीएम मशिनशी छेडछाड केल्यानंतर भाजपाच्या उमेदवारांना जिंकवण्यात आलं आहे. त्यानंतर आपच्या सौरभ भारद्वाज यांनी एका प्रात्यक्षिकाद्वारे ईव्हीएम मशिनशी छेडछाड करणं शक्य असल्याचं म्हटलं आहे. मात्र त्याच वेळी भाजपाच्या सदस्यांनी केजरीवालांच्या कथित 1 हजार कोटींच्या घोटाळ्याचा मुद्दा उपस्थित केला असता, त्यावर अध्यक्षांनी चर्चा करण्यास नकार दिला.

 

भाजपाचे विजेंदर गुप्ता दस्तऐवज घेऊन विधानसभेत पोहोचले असता, अध्यक्षांनी पुरावे विधानभवनाच्या पटलावर ठेवण्यास मंजुरी दिली नाही. तसेच भाजपचा स्थगन प्रस्ताव रद्द केला. त्यामुळे गुप्ता विधानसभेच्या बाहेरच उपोषणाला बसले होते. तत्पूर्वी पाकिस्तानकडून करण्यात आलेल्या गोळीबारात शहीद झालेल्या भारतीय जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली.