नशिराबाद टोल नाक्यावर बनावट देशी दारू पकडली
By admin | Updated: September 10, 2016 00:48 IST
जळगाव : राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने शुक्रवारी सकाळी ८ वाजेच्या सुमारास नशिराबाद टोल नाक्यावर सुमारे ६ लाख रुपये किंमतीचा बनावट देशी दारुचा साठा वाहून नेणारा ट्रक पकडला. या कारवाईत ट्रकसह १६ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून ट्रक चालक उमेश राज स्वामी (वय ३४, रा.काटोल रोड, नागपूर) यास अटक झाली आहे. त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नशिराबाद टोल नाक्यावर बनावट देशी दारू पकडली
जळगाव : राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने शुक्रवारी सकाळी ८ वाजेच्या सुमारास नशिराबाद टोल नाक्यावर सुमारे ६ लाख रुपये किंमतीचा बनावट देशी दारुचा साठा वाहून नेणारा ट्रक पकडला. या कारवाईत ट्रकसह १६ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून ट्रक चालक उमेश राज स्वामी (वय ३४, रा.काटोल रोड, नागपूर) यास अटक झाली आहे. त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पाठलाग करून पकडला ट्रकधुळ्याकडून भुसावळच्या दिशेने बनावट देशी दारुचा साठा घेऊन एक ट्रक जळगावमार्गे जाणार असल्याची माहिती गुप्त बातमीदाराकडून राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक एस.एल. आढाव व विभागीय निरीक्षक सी.पी. निकम यांना मिळालेली होती. त्या अनुषंगाने निरीक्षक सी.पी. निकम, सहायक दुय्यम निरीक्षक मधुकर वाघ, भूषण वाणी, संतोष निकम, मुकेश पाटील, प्रवीण वाघ आदींच्या पथकाने महामार्गावर सापळा लावून दोन दिवसांपासून पाळत ठेवली होती. शुक्रवारी सकाळी ७.३० वाजेच्या सुमारास धुळ्याकडून भुसावळच्या दिशेने जाणार्या (एमएच ४० एके २१४६) क्रमांकाच्या ट्रकमधून बनावट देशी दारुची वाहतूक होत असल्याची खात्री पटल्याने पथकाने हा ट्रक पाठलाग करून नशिराबाद टोल नाक्यावर पकडला.लाकडी भुश्श्याखाली लपवली दारूट्रकमधील दारुचा साठा कोणाच्याही नजरेस पडू नये, म्हणून ट्रकमध्ये खाली बनावट देशी दारुच्या बाटल्यांचे खोके ठेऊन त्यावर लाकडी भुश्श्याचे पोते ठेवलेले होते. मात्र, पथकाने ट्रकची बारकाईने तपासणी करून दारू तस्करांचे पितळ उघडे केले. पथकाने ट्रक चालक उमेश स्वामी यास अटक केली असून त्याच्याविरुद्ध मुंबई दारुबंदी कायदा कलम १९४९ चे कलम ६५ (अ), (इ), ८०, ८३, ९८ (२) व १०८ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. त्याला दुपारी न्यायालयात हजर करण्यात आले होते. न्यायालयाने त्यास न्यायालयीन कोठडी सुनावली.जप्त मुद्देमाल असा-१० लाख रुपये किंमतीचा १ आयशर ट्रक-५ लाख ९२ हजार २५० रुपये किंमतीची बनावट देशी दारू-२५ हजार दारुच्या बाटल्या-२५० बॉक्स.............कोटट्रकमधून बनावट ६ लाख रुपये किंमतीची देशी दारुची वाहतूक होत असल्याची माहिती मिळालेली होती. त्यानुसार पथक तयार करून महामार्गावर दोन दिवसांपासून सापळा लावलेला होता. नशिराबाद टोल नाक्यावर हा ट्रक पकडला.-सी.पी. निकम, विभागीय निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क विभाग.