शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

देशविरोधी कारवायांसाठी टिकटॉक, हेलोचा वापर?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2019 04:33 IST

भारतामध्ये देशविरोधी कारवायांसाठी टिकटॉक, हेलो यांचा वापर केला जात आहे, अशी तक्रार आल्यानंतर केंद्र सरकारने या चिनी बनावटीच्या सोशल मीडिया अ‍ॅपना २४ प्रश्नांच्या यादीसह नोटिसा बजावल्या आहेत.

नवी दिल्ली : भारतामध्ये देशविरोधी कारवायांसाठी टिकटॉक, हेलो यांचा वापर केला जात आहे, अशी तक्रार आल्यानंतर केंद्र सरकारने या चिनी बनावटीच्या सोशल मीडिया अ‍ॅपना २४ प्रश्नांच्या यादीसह नोटिसा बजावल्या आहेत. या प्रश्नांची २२ जुलैपर्यंत समाधानकारक उत्तरे न दिल्यास दोन्ही अ‍ॅपवर बंदीही घातली जाऊ शकते असा इशाराही सरकारने दिला आहे. या अ‍ॅपचा वापर देशविरोधी कारवाया व बेकायदेशीर कृत्यांसाठी केला जात असल्याची तक्रार रा. स्व. संघाशी संलग्न स्वदेशी जागरण मंचने केंद्र सरकारकडे केली होती. त्यावर केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने ही पावले उचलली आहेत.यासंदर्भात टिकटॉक व हेलोने एका संयुक्त निवेदनात म्हटले आहे की, भारत आमच्या मोठ्या बाजारपेठांपैकी एक आहे. तेथील सरकारने आखलेले नियम व अटींचे पालन करण्यासाठी आम्ही संपूर्ण सहकार्य करू. मॉर्फ केलेल्या ११ हजार राजकीय जाहिराती इतर समाजमाध्यमांमध्ये झळकविण्यासाठी हेलोने मोठी रक्कम अदा केल्याचा आरोप आहे. भारतात एखादी व्यक्ती १८ वर्षे पूर्ण झाल्यानंतर कायद्याने प्रौढ ठरते. असे असूनही टिकटॉक, हेलो वापरण्यासाठी १३ वर्षे वय पूर्ण असण्याची पात्रता का ठरविण्यात आली असाही सवाल सरकारने विचारला आहे. टिकटॉक, हेलो ही अ‍ॅप चीनमधील बाइटडान्स या कंपनीच्या मालकीची आहेत.>भारतीयांची माहिती अन्य देशांना देऊ नकाभारतीय नागरिकांची जमा झालेली माहिती अन्य कोणत्याही देशाला किंवा खाजगी कंपनी, संस्थेला देणार नाही, अशी हमी टिकटॉक, हेलो यांच्याकडून केंद्र सरकारने मागितली आहे. हे दोन्ही अ‍ॅप देशविरोधी कारवायांचे आगर बनल्याच्या तक्रारीबद्दल त्यांच्याकडून स्पष्टीकरण मागविण्यात आले आहे. अफवा, खोट्या बातम्यांचा प्रसार रोखण्यासाठी टिकटॉक, हेलोने काय उपायोजना केल्या आहेत याची विचारणाही केंद्र सरकारने पाठविलेल्या नोटीसमध्ये केली आहे.

टॅग्स :Tik Tok Appटिक-टॉक