शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

आरआयसॅट-२बीचे आज प्रक्षेपण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2019 05:50 IST

उपग्रह : सीमेवर निगराणी, कृषी, वन, आपत्ती व्यवस्थापनास उपयुक्त

चेन्नई : श्रीहरीकोटा येथून बुधवारी सकाळी ५.३० वाजता आरआयसॅट-२बी या उपग्रहाचे प्रक्षेपण करण्यात येणार असून, त्याच्या उड्डाणाची२५ तासांची उलटगिणती मंगळवारी पहाटे ४.३० वाजता सुरू झाली, अशी माहिती भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रो) दिली. हा सर्व प्रकारच्या हवामानात रडार इमेजिंगद्वारे निगराणी करणारा हा उपग्रह आहे. 

पीएसएलव्ही-सी४६ ची ही ४८वी मोहीम असून, सतीश धवन अंतराळ केंद्रातून हा ६१५ किलो वजनाचा उपग्रह प्रक्षेपण केल्यानंतर१५व्या मिनिटाला पृथ्वीच्या कक्षेत सोडला जाईल. हा उपग्रह गुप्त निगराणी, कृषी, वन व आपत्ती व्यवस्थापन यासारख्या क्षेत्रांत मोलाची मदत करणार आहे. इस्रोसाठी ही मोहीम अत्यंत महत्त्वपूर्ण आहे, अशी माहिती इस्रोचे प्रमुख के. शिवन यांनी दिली. तसेच या मोहिमेबाबत जास्त माहिती देण्यास नकार दिला.

आरआयसॅट-२बी हा उपग्रह २००९ मध्ये प्रक्षेपित केलेल्या आरआयसॅट-२ या उपग्रहाची जागा घेईल. नवा उपग्रह पृथ्वीची छायाचित्रे दिवसा आणि रात्रीही घेऊ शकणार आहे. तसेच ढगाळ हवामानांच्या स्थितीतही उपग्रह आपले काम चोख बजावणार आहे. या उपग्रहाचे आयुष्य पाच वर्षांचेआहे व ते लष्करी निगराणीसाठीही काम करणार आहे. सध्याचा आरआयसॅट-२ उपग्रह हाही सीमावर्ती भागावर बारीक नजर ठेवून होता व पाकिस्तानच्या संभाव्य घुसखोरीची खबर देत होता.

इस्रोचे या वर्षातील पीएसएलव्हीचे हे तिसरे प्रक्षेपण असेल. २०१९मध्ये १ एप्रिल रोजी एमिसॅट व २९ आंतरराष्टÑीय उपग्रह अंतराळात सोडलेले आहेत.२४ जानेवारी रोजी मायक्रोसॅट-आर व कलामसॅट-व्ही२ उपग्रह यशस्वीरीत्या प्रक्षेपित केलेले आहेत. इस्रोने आरआयसॅट-१ (रडार उपग्रह-१) हा मायक्रोवेव्ह रिमोट सेन्सिंग उपग्रह २६ एप्रिल २०१२ रोजी सोडण्यात आला होता. (वृत्तसंस्था)

चंद्रावर दुसरी मोहीम जुलैमध्येउपग्रहाच्या प्रक्षेपणापूर्वी तिरूपती बालाजीच्या मंदिरात पूजा-अर्चना केल्यानंतर इस्रोचे प्रमुख के. शिवन यांनी सांगितले की, आरआयसॅट-२बी नंतर इस्रोचे संपूर्ण लक्ष चंद्रयान-२वर आहे. त्याचे प्रक्षेपण ९ ते १६ जुलैच्या दरम्यान केले जाणार आहे. चंद्रयानच्या मोहिमेकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. इस्रो ६ सप्टेंबरपर्यंत चंद्रयान-२ च्या रोव्हरला चंद्राच्या पृष्ठभागावर उतरवण्याच्या प्रयत्नात आहे.