घुमान : पंजाबमध्ये संत नामदेवांच्या घुमान या कर्मभूमीत ८८वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन शुक्रवारपासून रंगणार आहे.संमेलनाचे उद्घाटन दुपारी ४ वाजता पंजाबचे मुख्यमंत्री प्रकाशसिंग बादल यांच्या हस्ते होणार असून, या वेळी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाजबांधणीमंत्री नितीन गडकरी, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष माजी केंद्रीय मंत्री शरद पवार आणि ज्ञानपीठ पुरस्कार विजेते गुरूदयाल सिंग तसेच संमेलनाध्यक्ष डॉ. सदानंद मोरे उपस्थित राहणार आहेत.तत्पूर्वी, संतश्रेष्ठ नामदेव नगरीत सकाळी ९ वाजता अ. भा. मराठी साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा डॉ. माधवी वैद्य यांच्या हस्ते ध्वजारोहण होणार होते. मात्र घुमानमध्ये अवकाळी पाऊस सुरु असल्याने मैदानातील ब-याच ठिकाणी चिखल झाले होते. तसेच साहित्य रसिकांना घेऊन पुण्यातून निघालेली एक्सप्रेस विलंबाने दाखल झाल्याने सकाळचे सर्व कार्यक्रम पुढे ढकलावे लागले. आता दुपारी दोन वाजता ध्वजारोहण, ग्रंथदिंडी व ग्रंथप्रदर्शनाचे उद्घाटन होईल.
नामदेवांच्या कर्मभूमीत आजपासून साहित्याचा मेळा
By admin | Updated: April 3, 2015 12:37 IST