शहरं
Join us  
Trending Stories
1
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
2
Top Marathi News LIVE Updates: आशा भोसले यांच्या पार्थिवावर आज संध्याकाळी अंत्यसंस्कार
3
पिंपरी: धक्कादायक! प्राध्यापकाच्या छळामुळे विद्यार्थिनीने उचललं टोकाचं पाऊल, एकाला अटक
4
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; खरेदी करणार असाल तर पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K Gold चे नवे दर
5
IPL 2026 Points Table : गत चॅम्पियन RCB टॉप ३ मध्ये; पाचवेळच्या विजेत्या MI अन् CSK ची अवस्था बिकट
6
धर्मांतर प्रयत्नप्रकरणी नाशिकमधील 'त्या' बहुराष्ट्रीय कंपनीतील आरोपी निलंबित
7
वेतनवाढीच्या मागणीवरून कामगार आक्रमक; वाहनांची तोडफोड आणि दगडफेक, नोएडातील घटना!
8
ट्रम्प यांच्या धमकीनंतर शेअर बाजारात भूकंप; सेन्सेक्स १४०० अंकांनी आपटला; निफ्टी २४ हजारांच्या खाली
9
सिंधुदुर्ग जिल्ह्यात ग्रामपंचायतीच्या १००हून अधिक रिक्त जागांसाठी पोटनिवडणुकीची नोटीस जारी
10
SBI Home Loan: स्टेट बँकेतून ५० लाख रुपयांचं होम लोन घ्यायचंय; पाहा किती असावी लागेल सॅलरी?
11
IPL 2026: भर मैदानात टिम डेव्हिडची ‘दादागिरी’! पंचांच्या हातून चेंडू हिसकावला अन्...; पाहा नेमकं काय घडलं?
12
वेगाचा बादशाह जेव्हा स्वराभिषेकात न्हाऊन निघाला, ब्रेट लीने आशा भोसले यांच्यासोबत गायले होते गाणे
13
वाटाघाटी फिसकटल्या, आता पुन्हा युद्ध... ट्रम्प यांच्या आदेशाने इराणवर परत सुरु होणार हल्ले?
14
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
15
Accident: लग्नाहून परतताना मृत्यूनं कवटाळलं, हापूड जिल्ह्यात वऱ्हाड्यांच्या बसला भीषण अपघात, ६ जण ठार!
16
डोनाल्ड ट्रम्प यांची होर्मुजच्या सामुद्रधुनीवर बंदी घालण्याची धमकी, Crude Oil च्या किमतीचा भडका, किती झाली किंमत?
17
Asha Bhosle Funeral: निरोपाची वेळ आली..! आशा भोसले यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार होणार, दुपारी तीन वाजेपर्यंत अंत्यदर्शन
18
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
19
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
20
उरले उरात काही 'आवाज' चांदण्यांचे, आशा भोसले यांचे निधन, आज होणार अंत्यसंस्कार
Daily Top 2Weekly Top 5

आज जगभर योग‘लाट’

By admin | Updated: June 21, 2015 01:16 IST

आज रविवार २१ जून रोजी भारतासह जगभरातील १९१ देशांमध्ये पहिला आंतरराष्ट्रीय योगदिन साजरा करण्यात येत असून याची जय्यत तयारी झाली आहे.

नवी दिल्ली : आज रविवार २१ जून रोजी भारतासह जगभरातील १९१ देशांमध्ये पहिला आंतरराष्ट्रीय योगदिन साजरा करण्यात येत असून याची जय्यत तयारी झाली आहे. विशेष म्हणजे भारतानेच संयुक्त राष्ट्रासमक्ष योगदिनाच्या आयोजनाचा प्रस्ताव मांडला होता. या प्रस्तावाला १९३ पैकी १७७ देशांनी पाठिंबा दिला. विशेष म्हणजे ४७ मुस्लीम देशांचेही याला समर्थन मिळाले.योगदिनानिमित्त देशातील लखनौ, कोलकाता, पाटणासह बहुतांश राज्यांमध्ये असंख्य ठिकाणी योग शिबिरांचे आयोजन करण्यात आले असून, गिनीज बुक आॅफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये या दिनाची नोंद व्हावी यासाठी प्रयत्न सुरू आहेत.भारतासोबतच लंडन, मेलबर्न, दुबई, बुडापेस्ट, हो चिन्ह मीन, हाँगकाँग, पोर्ट लुईस, पॅरिस, जकार्ता, बर्लिन, न्यूयॉर्क आणि बोगोटासह जगभरातील २५१ वर मोठ्या शहरांमध्ये योगदिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. अनेक मुस्लीम देशांमध्येसुद्धा योगाभ्यासासाठी चटया घालण्याचे काम सुरू आहे. राजधानी दिल्लीत राजपथावर आयोजित कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह विविध पक्षांचे नेते, बॉलिवूडचे कलाकार, सशस्त्र दलाचे जवान, शाळकरी विद्यार्थी आणि सामान्य नागरिकांचा सहभाग असणार आहे. जगात प्रथमच साजरा होत असलेल्या आंतरराष्ट्रीय योगदिन कार्यक्रमाची गिनीज बुक आॅफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद व्हावी यासाठी राजपथ सज्ज झाला आहे. एकाच स्थळी ४५ हजार लोकांनी एकसाथ योगासने करण्याचा हा विक्रम असणार आहे. यापूर्वी कन्याकुमारीतील एका स्वयंसेवी संघटनेच्या योग कार्यक्रमात १९ नोव्हेंबर २००५ रोजी २९,९७३ लोक सहभागी झाले होते. याशिवाय गिनीज बुकमध्ये एकसाथ ५० देशांमधील लोक योग कार्यक्रमात सहभागी झाल्याची नोंद आहे.राजपथवर सकाळी ६ वाजून ४५ मिनिटांनी योगाभ्यास सुरू होईल. यावेळी ३५ मिनिटांच्या कालावधीत १५ योगासने करण्यात येतील. कार्यक्रम ऋग्वेदातील श्लोकाने सुरू होईल आणि त्यानंतर मुक्तासन, मकरासन, कपालभारती, प्राणायाम आदी योगाभ्यास केले जातील. सशस्त्र दलाच्या तीनही सेना तसेच निमलष्करी दलांचा या कार्यक्रमात सक्रिय सहभाग आहे. दरम्यान, विविध देशांमधील भारतीय दूतावासांसाठी योगावर आधारित कॉफीटेबल बुकच्या ७ हजारांवर प्रती आणि १९,००० संदर्भ पुस्तिका पाठविण्यात आल्या आहेत. इंग्लंडमध्ये योगदिन मोठ्या प्रमाणात साजरा होणार आहे. भारतीय दूतावासातर्फेही टेम्स नदीच्या दक्षिण किनाऱ्यावरील स्पेन गार्डनमध्ये योग कार्यक्रम होईल. अमेरिकेच्या शिकागो शहरात अल्पसंख्यक मंत्री नजमा हेपतुल्ला यांच्या नेतृत्वात योगदिन समारंभ पार पडेल. (लोकमत न्यूज नेटवर्क)संयुक्त राष्ट्र मुख्यालयातही योगारविवारी पहिला आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यासाठी व्यापक स्तरावर तयारी सुरू आहे. मुख्य कार्यक्रम संयुक्त राष्ट्र मुख्यालयात आयोजित करण्यात येणार असून त्यात भारताच्या परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज, संयुक्त राष्ट्रसंघाचे सरचिटणीस बान की मून, आमसभेचे अध्यक्ष सॅम कुतेसा, अमेरिकी काँग्रेसचे सदस्य तुलसी गबार्ड, भारतीय आध्यात्मिक गुरू श्रीश्री रविशंकर भाग घेतील. यावेळी बान यांचे मार्गदर्शन होईल. न्यूयॉर्कच्या टाइम्स स्क्वेअर येथे ३० हजार लोक योगाभ्यास करणार असून विशाल इलेक्ट्रॉनिक पडद्यांवर त्याचे थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे. भारतीय परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज, युनो आमसभेचे अध्यक्ष उपस्थित राहतील.