शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

आज शक्तिपरीक्षा, बहुमत सिद्ध करण्याचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2018 14:14 IST

कर्नाटकात सत्ता स्थापन करणाऱ्या भाजपाला शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयाने दणका दिला असून, मुख्यमंत्री येडियुरप्पा यांना आज ४ वाजता विधानसभेत विश्वासदर्शक ठराव मांडण्यास सांगितले आहे.

नवी दिल्ली/बंगळुरू : कर्नाटकात सत्ता स्थापन करणाऱ्या भाजपाला शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयाने दणका दिला असून, मुख्यमंत्री येडियुरप्पा यांना आज ४ वाजता विधानसभेत विश्वासदर्शक ठराव मांडण्यास सांगितले आहे. तो मंजूर होईपर्यंत धोरणात्मक निर्णय घेऊ नयेत तसेच अँग्लो इंडियन सदस्याची विधानसभेवर नियुक्ती करू नये, असेही बजावले आहे.येडियुरप्पांना सरकार स्थापनेसाठी निमंत्रण देण्याच्या निर्णयाला आव्हान देणा-या काँग्रेस व जनता दल यांच्या याचिकेवरील सुनावणीनंतर न्या ए. के. सिक्री, न्या. अशोक भूषण व न्या. शरद बोबडे यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला. येडियुरप्पा यांचा काल शपथविधी झाला, पण त्यांना ते उद्या बहुमत कसे सिद्ध करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.काँग्रेस, जनता दल व अन्य तीन अपक्ष आमदार हैदराबादमधील हॉटेलातून निघाले आहेत. काँग्रेसचे ७७ व अन्य तीन असे ८0 आमदार एकत्र आहेत, असे काँग्रेस नेते राजशेखर रेड्डी पाटील यांनी सांगितले. आमदारांना उद्या ११ वाजता विधानसभेत आणले जाईल. आमदार फोडण्याची संधी भाजपाला मिळू नये, म्हणून हे करण्यात आले आहे. दरम्यान, जेडीएस नेते कुमारस्वामी यांनी आपले दोन आमदार भाजपाने पळवल्याचा आरोप करीत ते पुन्हा पक्षात परततील, असा दावा केला आहे. सदस्यांचा शपथविधीनंतर लगेच विश्वासदर्शक ठराव मांडून त्यावर हात वर करून मतदान व्हावे, असेही न्यायालयाने बजावले आहे. त्याचे चित्रिकरण करण्याची काँग्रेसचे अ‍ॅड. अभिषेक मनु सिंघवी यांची विनंतीही न्यायालयाने मान्य केली आहे.>पैसे व बळाच्या वापराची काँग्रेसला भीतीसर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत करतानाच, त्यामुळे लोकशाही प्रस्तापित होण्यास मदत होईल, असे सांगत, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी भाजपावर टीका केली. बहुमत नसूनही येनकेन प्रकारेण ते सिद्ध करण्यासाठी भाजपा पैसा व बळाचा वापर करेल, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली. भाजपा बहुमत सिद्ध करण्यासाठी आमदारांना पैशाद्वारे फोडण्याचा प्रयत्न करीत असल्याचा अ‍ॅड. अभिषेक मनू सिंघवी यांनीही आरोप केला आहे.>बहुमत निश्चितच सिद्ध करूविधानसभेत आपण बहुमत निश्चितच सिद्ध करू, असा दावा मुख्यमंत्री येडियुरप्पा यांनी केला. भाजपाचे नेते व केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनीही भाजपा बहुमत सिद्ध करेल, असे सांगितले>आठवड्याचा अवधी नाकारलाबहुमत सिद्ध करण्यासाठी एक आठवड्याचा अवधी द्यावा, ही भाजपाचे अ‍ॅड. मुकुल रोहटगी यांची विनंती न्यायालयाने अमान्य केली. विश्वासदर्शक ठराव मांडण्यासाठी किती अवधी द्यावा, हा राज्यपालांचा अधिकार असून, त्यात न्यायालय हस्तक्षेप करू शकत नाही, हा युक्तिवादही मान्य झाला नाही.>पैशाचे आमिष;आली ध्वनिफीतकाँग्रेसच्या रायचूरमधील एका आमदाराला पैशाचे आश्वासन देऊ न फोडण्याचा प्रयत्न भाजपाचे जनार्दनरेड्डी करीत असल्याची एक ध्वनिफीत काँग्रेसने जारी केली आहे.

टॅग्स :Karnatakकर्नाटकKarnataka Assembly Elections 2018कर्नाटक विधानसभा निवडणूक २०१८Karnataka Election Results 2018कर्नाटक निवडणूक निकाल २०१८