सावर्डेत आज विज ट्रान्सफार्मरचे उद्घाटन
By admin | Updated: May 5, 2015 01:21 IST
सावर्डे : वीज खात्यातर्फे धडे-सावर्डे येथे उभारण्यात आलेल्या २०० केव्हीज या नव्या वीज ट्रान्सफार्मरचे उद्घाटन दि. ५ मे रोजी सकाळी १० वा. सावर्डेचे आमदार तथा औद्योगिक विकास महामंडळाचे अध्यक्ष गणेश गावकर यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.
सावर्डेत आज विज ट्रान्सफार्मरचे उद्घाटन
सावर्डे : वीज खात्यातर्फे धडे-सावर्डे येथे उभारण्यात आलेल्या २०० केव्हीज या नव्या वीज ट्रान्सफार्मरचे उद्घाटन दि. ५ मे रोजी सकाळी १० वा. सावर्डेचे आमदार तथा औद्योगिक विकास महामंडळाचे अध्यक्ष गणेश गावकर यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. यावेळी सावर्डेच्या जिल्हा पंचायत सदस्या सुवर्णा तेंडुलकर, सावर्डेचे सरपंच संजय नाईक, उपसरपंच उल्हास नाईक, स्थानिक पंचसदस्य शशिकांत नाईक यांच्यासह इतर पंच उपस्थित राहणार आहेत. धडे सावर्डे येथे गेल्या कित्येक वर्षांपासून कमी दाबाचा वीज पुरवठा होत असल्याने या ठिकाणी नीन ट्रान्सफार्मरची उभारणी करावी, अशी लोकांची वारंवार मागणी होत होती. लोकांनी ग्रामसभेत ही कित्येकदा हा विषय मांडून ठराव घेतले होते. शेवटी या ठिकाणी नवीन ट्रान्सफार्मरची मागणी पूर्ण करण्याचे काम आमदार गणेश गावकर यांच्या प्रयत्नातून पूर्ण होत असल्याने लोक समाधान व्यक्त करीत आहेत. (लो.प्र.)