नवी दिल्ली : ज्या पाच राज्यांत विधानसभेच्या निवडणुका व्हायच्या आहेत, तिथे कोरोनाचा फारसा संसर्ग, ओमायक्रॉनचा प्रसार झालेला नाही. अशी माहिती केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी निवडणूक आयोगाला दिली. आरोग्य सचिवांकडून ५ राज्यांतील कोरोनास्थितीची माहिती घेतल्यानंतर निवडणूक आयोगाचे अधिकारी उत्तर प्रदेशला रवाना झाले. तेथील परिस्थितीचा ते तीन दिवस आढावा घेतील आणि आपला अहवाल सादर करतील. या पाचही राज्यांत ओमायक्रॉनची बाधा झालेल्याचे प्रमाण फारच कमी आहे.
पाचही राज्यांत वेळेवरच निवडणुकीच्या हालचाली
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2021 05:55 IST