शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

‘काळ’ कोसळला!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2017 04:36 IST

ढगफुटीनंतर झालेल्या भूस्खलनात हिमाचलप्रदेशामध्ये ४६ जणांचा मृत्यू झाला.

शिमला : ढगफुटीनंतर झालेल्या भूस्खलनात हिमाचलप्रदेशामध्ये ४६ जणांचा मृत्यू झाला. महामार्गावरून जाणाºया राज्य परिवहन मंडळाच्या दोन बसवर दरड कोसळल्याने त्यातील सर्व प्रवाशांवर आणि आसपासच्या घरांतील लोकांवर या दरडींच्या रूपाने रविवारी रात्री ‘काळ’ कोसळला आहे. रात्री उशीरापर्यंत राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाचे जवानांकडून मदतकार्य सुरू होते. बेपत्ता असलेल्याची संख्या मोठी असल्याने मृतांची संख्या वाढेल, अशी भीती व्यक्त केली जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या अपघातात झालेल्या जीवित हानीबद्दल वेदना झाल्याचे टिष्ट्वटरवर म्हटले.रात्री १.१५च्या सुमारास दरडी कोसळल्या व त्यामुळे मंडी-पठाणकोट राष्ट्रीय महामार्ग १५४ च्या कोत्रुपी खेड्यातील १०० मीटर भागाची हानी झाली. या महामार्गावरून एक बस मनाली येथून कातरा तर दुसरी चांभा येतून मनालीली निघाली होती. या दोन्ही बस हिमाचल प्रदेश राज्य परिवहन महामंडळाच्या होत्या. दरडी कोसळल्यामुळे रस्ता वाहून गेला व त्यामुळे बसगाड्या ८०० मीटर खोल दरीत पडल्या. एक बस तर दरडीखाली पूर्णपणे गाडली गेल्यामुळे तिचा रात्री उशीरापर्यंत शोध लागला नव्हता. या बसमध्ये तब्बल ५० प्रवासी होते. त्यामुळे मृतांची संख्या वाढण्याची भीती आहे.हिमाचलचे मुख्यमंत्री वीरभद्र सिंह यांनी घटनास्थळी भेट दिली. ते म्हणाले की, सर्वांना बाहेर काढेपर्यंत मदतकार्य सुरू राहील. पाच जखमींना मंडी रुग्णालयात दाखल करण्यात करण्यात आले आहे. सर्व जखमींच्या उपचाराचा खर्च राज्य सरकार करणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले. मुख्यमंत्र्यांनी मृतांच्या नातेवाइकांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. आरोग्यमंत्री कौल सिंग ठाकूर, परिवहन मंत्री जीएस बाली आणि ग्रामविकास मंत्री अनिल शर्मा हेही घटनास्थळी भेट देऊन आले. आरोग्यमंत्री ठाकूर यांनी मृतांच्या नातेवाइकाला ४ लाखाची मदत जाहीर केली. तर परिवहन मंत्र्यांनी १ लाख रुपयांची मदतजाहीर केली. (वृत्तसंस्था)>250 मीटरचा संपूर्ण परिसर मलब्याखाली गाडला गेला असून, त्यात दोन वाहने आणि अनेक घरे अडकली आहेत. त्यात अनेक जण गाडले गेले असण्याची भीती आहे. महामार्ग बंद करण्यात आला आहे.