शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

टिळकांचा ‘दहशतवादी’ असा उल्लेख हल्लीच्या अर्थाने नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2018 02:19 IST

राजस्थानमध्ये इयत्ता आठवीसाठीच्या समाजशास्त्राच्या इंग्रजी पुस्तकात लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची ओळख ‘दहशतवादाचे जनक’ (फादर आॅर टेररिझम) अशी दिली

जयपूर : राजस्थानमध्ये इयत्ता आठवीसाठीच्या समाजशास्त्राच्या इंग्रजी पुस्तकात लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची ओळख ‘दहशतवादाचे जनक’ (फादर आॅर टेररिझम) अशी दिली जाण्यावरून टीका झाल्यानंतर राजस्थानच्या शालेय शिक्षणमंत्र्यांनी सारवासरव करून त्या उल्लेखाचे समर्थन करण्याचा प्रयत्न केला.राजस्थानचे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण खात्याचा स्वतंत्र कार्यभार असलेले राज्यमंत्रीवासुदेव देवनानी यांनी एकानिवेदनात म्हटले की, पुस्तकात टिळकांचा ‘दहशतवादाचे जनक’ असा जो उल्लेख आहे त्याचा दहशतवादाच्या सध्याच्या व्याख्येने अर्थ लावणे चुकीचे आहे. हा शब्धप्रयोग स्वातंत्र्यलढ्याच्या संदर्भात केलेला आहे व त्याचा अर्थ देश सोडून जाण्यासाठी इंग्रजांना भयभीत करणे एवढाच आहे.देवनानी यांनी असेही म्हटले की, इंग्रजांच्या मनात भीती निर्माण झाली तरच ते भारत सोडून जातील, असे स्वत: टिळकांचे म्हणणे होते. त्यामुळे काही संतापलेल्या इंग्रज इतिहासकारांनी ‘दहशतवादीचे जनक’ यासह इतरही अनेक शब्दप्रयोग टिळकांच्या संदर्भात केले. त्यामुळे त्या शब्दाचा अर्थ हल्लीच्या काळात दहशतवाद हा शब्द ज्या अर्थाने वापरला जातो त्या अर्थाने केला जाऊ नये.ज्या पुस्तकात हा उल्लेख आहेते सरकारी शालेय पाठ्यपुस्तकनाही तर एका खासगी प्रकाशकाने प्रकाशित केलेले संदर्भ पुस्तकआहे, याचाही देवनानी यांनीपुनरुच्चार केला. मथुरा येथील‘स्टुडन्ट अ‍ॅडव्हायजस पब्लिकेशन्सप्रा. लि.’ या खासगी प्रकाशकानेसन २०१४ मध्ये हे पुस्तक प्रकाशित केले आहे.प्रकाशन संस्थचे एक अधिकारी राजपाल सिंग यांनी याआधी असे सांगितले होते की, भाषांतरकारानेही चूक केली आहे. ती लक्षात आल्यावर गेल्या महिन्यात सुधारित आवृत्ती काढताना ही चूक सुधारण्यात आली आहे. चूक असलेली पुस्तकाची आवृत्ती गेल्या वर्षी प्रसिद्ध झालीहोती. (वृत्तसंस्था)