शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
4
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
5
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
6
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
7
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
8
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
9
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
10
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
11
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
12
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
13
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
14
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
15
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
16
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
17
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
18
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
19
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
20
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
Daily Top 2Weekly Top 5

चित्त्यांना भारतात घेऊन येणार वाघाचे विमान; १९४८ साली झालं होतं अखेरचं दर्शन

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2022 07:27 IST

शनिवारी, १७ सप्टेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मध्य प्रदेशमधील कुनो राष्ट्रीय उद्यानात सोडले जाणार आहेत.

 

पंतप्रधान मोदींच्या हस्ते शनिवारी सोडणार कुनो राष्ट्रीय उद्यानात 

विंडहोक : नामिबियातून आठ चित्त्यांना भारतात घेऊन येणाऱ्या विमानावर भारताचा राष्ट्रीय प्राणी वाघाचे चित्र रंगविण्यात आले आहे. त्या विमानाचे समाजमाध्यमांवर झळकलेले छायाचित्र सर्वांच्या औत्सुक्याचा विषय बनले आहे. 

भारतातून १९५०च्या दशकात चित्ते नामशेष झाले. त्यांचा देशात पुन्हा अधिवास तयार व्हावा, यासाठी नामिबियातून चित्ते आणून ते शनिवारी, १७ सप्टेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मध्य प्रदेशमधील कुनो राष्ट्रीय उद्यानात सोडले जाणार आहेत.चित्त्यांना घेऊन येणारे बी ७४७ प्रकारचे जेट विमान नामिबियात दाखल झाले आहे. या विमानातूून पाच नर व तीन मादी चित्ते जयपूर येथे विमानाने आणले जातील. त्यानंतर त्यांना हेलिकॉप्टरद्वारे मध्य प्रदेशातील कुनो राष्ट्रीय उद्यानात नेले जाणार आहे. (वृत्तसंस्था)

असा नामशेष झाला भारतातून चित्ता... चित्ता भारतातून नामशेष झाल्याची घोषणा सरकारने १९५२ साली केली. देशात शेवटचा चित्ता छत्तीसगड येथील साल जंगलामध्ये १९४८ साली मरण पावला. चित्त्याला पुन्हा भारतात आणण्यासाठी १९७०च्या दशकापासून केंद्र सरकारने सुरू केले. त्यासाठी नामिबियाबरोबर भारताने करार केला होता. त्यानुसार नामिबियाने आता भारताला आठ चित्ते देऊ केले आहेत.  

संपूर्ण प्रवास होणार उपाशीपोटी : नामिबिया ते भारत हा संपूर्ण प्रवास चित्त्यांना उपाशीपोटी करावा लागणार आहे. कारण इतक्या लांबच्या प्रवासात प्राण्यांनाही मळमळल्यासारखे वाटू शकते. त्यामुळे त्यांना या प्रवासात काहीही खायला देण्यात येणार नाही. 

सकाळी ७ वाजता नामीबियाहून कार्गो विमान जयपूरला पोहोचणार

सकाळी ९ वाजता जयपूरहून हेलिकॉप्टरने श्योपूर येथे पाठवण्यात येणार