शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
2
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
3
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
4
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
5
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
6
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
7
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
8
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
9
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
10
आयोग नव्हे, मतदारच राजा !
11
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
12
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
13
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
14
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
15
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?
16
‘नॅनो बनाना’ची जादू, ‘रेट्रो’ फोटो, त्यामागचे धोके!
17
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
18
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
19
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
20
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज

२०२२ ची व्याघ्रगणना हे आतापर्यंतचे सर्वांत विशाल वन्यजीव सर्वेक्षण

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2023 05:47 IST

२०२२ ची व्याघ्रगणना हे आतापर्यंतचे सर्वांत व्यापक, विशाल वन्यजीव सर्वेक्षण आहे.

नवी दिल्ली :

२०२२ ची व्याघ्रगणना हे आतापर्यंतचे सर्वांत व्यापक, विशाल वन्यजीव सर्वेक्षण आहे. यात २० राज्यांसह ६ लाख ४१ हजार ४४९ किलोमीटरच्या प्रभावशाली पायी सर्वेक्षणाचा समावेश आहे, अशी माहिती राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाने (एनटीसीए) जारी  केलेल्या आकडेवारीतून समोर आली आहे. 

या अखिल भारतीय स्तरावरील व्याघ्रगणनेच्या अभ्यास पथकात एनटीसीए तसेच राज्यांमधील अधिकारी आणि तज्ज्ञ, संशोधन जीवशास्त्रज्ञ, वैज्ञानिक, समन्वयक, प्रशिक्षणार्थी व स्वयंसेवक यांचा समावेश होता. सर्वेक्षणाचा एक भाग म्हणून या पथकाने वनस्पती, मानवी प्रभाव आणि अशुद्ध मल यावरील माहिती प्राप्त करण्यासाठी ३,२४,००३ अधिवास भूखंडांचे नमुने घेतले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी म्हैसूर येथे एका कार्यक्रमात जारी केलेल्या ‘स्टेटस ऑफ टायगर्स २०२२’ अहवालानुसार ३२,५८८ ठिकाणी बसवलेल्या कॅमेऱ्यांमुळे वाघांच्या ९७,३९९ प्रतिमांसह एकूण ४,७०,८१,८८१ प्रतिमा मिळाल्या. “या अभ्यासासाठी  मोठ्या प्रमाणावर प्रयत्नांची गरज होती आणि तो पूर्ण करण्यासाठी पथकाने ६ लाख ४१ हजार १०२ मनुष्य दिवस खर्ची घातले. आम्ही मानतो की, आजपर्यंत करण्यात आलेला वन्यजीव सर्वेक्षणाचा जगातील हा सर्वांत मोठा प्रयत्न आहे, असे अहवालात म्हटले आहे. 

वाघांच्या संख्येत उत्साहजनक वाढवाघांची (एक वर्षाहून मोठ्या) एकूण ३,०८० छायाचित्रे कॅमेरा ट्रॅपमध्ये कैद झाली आहेत. २०१८ च्या (२,६९७) आकड्यांच्या तुलनेत ही संख्या वाघांच्या संख्येतील वाढ दर्शवते. “सर्वेक्षणाच्या निष्कर्षांनुसार भारतातील वाघांची किमान लोकसंख्या अंदाजे ३,१६७ आहे, जी वाघांच्या संख्येत उत्साहवर्धक वाढ दर्शवते,” असे पर्यावरण मंत्रालयाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

टॅग्स :Tigerवाघ