शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वे अॅपवरून करता येणार विमानाचं तिकीट बुकिंग

By admin | Updated: July 12, 2017 11:43 IST

प्रवाशांना आता मोबाइलवरील रेल्वे अॅपवरुन विमानाचं तिकिट बूक करता येणार आहे.

ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि. 12- ज्या प्रवाशांना विमानाचं तिकीट बुकिंग करायचं आहे अशा प्रवाशांसाठी एक सोपा पर्याय रेल्वेकडून मिळणार आहे. प्रवाशांना आता मोबाइलवरील रेल्वे अॅपवरुन विमानाचं तिकिट बूक करता येणार आहे.  रेल्वेकडून या आठवड्यात नवं मोबाइल अॅप लॉन्च करण्यात येणार आहे. या नव्या अॅपमुळे प्रवाशांना अनेक सोयी सुविधांचा लाभ घेता येइल. स्टेशनवरील हमालांची माहिती मिळवणं तसंच सेवा उपलब्ध करून घेणं, विश्रातीसाठी रूम बुकिंग तसंच खाद्यपदार्थ ऑर्डर करणं, या सर्व गोष्टी एकाच अॅपच्या माध्यमातून प्रवाशांना आता करता येणार आहेत. द इंडियन एक्सप्रेसने ही बातमी दिली आहे.
रेल्वेच्या सगळ्या सुविधा एका क्लिकवर मिळवून देणारं हे अॅप ‘क्रिस’ (सेन्ट्रल फॉर रेल्वे इन्फॉर्मेशन सिस्टम) या रेल्वेच्या सॉफ्टवेअर विभागाची जबाबदारी असलेल्या कंपनीने केली आहे. यासाठी सात कोटींचा खर्च झाल्याची माहिती या प्रोजेक्टमध्ये असणाऱ्या रेल्वे मंत्रालयातील अधिकाऱ्यांनी दिली. 
आणखी वाचा
 
रेल्वेच्या २०१६-१७ च्या बजेटमध्ये या अॅप संदर्भातील घोषणा करण्यात आली होती. ‘सध्या रेल्वेचं तिकिट बुकिंग, तक्रार निवारण तसंच सुविधांसाठी विविध अॅप उपलब्ध आहेत. अनेक अॅप्सचा गोंधळ मिटविण्यासाठी तिकीट बुकिंग आणि रेल्वेबद्दलच्या तक्रारी यांच्यासाठी दोन अॅप गरजेच आहे, असं रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी बजेटदरम्यानच्या त्यांच्या भाषणात म्हंटलं होतं.
 
‘सध्या रेल्वेच्या वेगवेगळया सेवांसाठी वेगवेगळे अॅप आहेत. विविध अॅपच्या माध्यमातून रेल्वेच्या विशिष्ट सेवा दिल्या जातात. रेल्वेकडून देण्यात येणाऱ्या सेवा प्रवाशांना एकाच ठिकाणी मिळायला हव्या, यासाठी रेल्वेकडून नव्या अॅपची निर्मिती करण्यात आली आहे. रेल्वेच्या सुविधांसाठी मोबाईल अॅप वापरणाऱ्या प्रवाशांना रेल्वेच्या प्रत्येक सेवेसाठी अॅप शोधून ते डाऊनलोड करावं लागत. या सगळ्या अॅपला पर्याय देण्यासाठी नव्या अॅपची निर्मिती करण्यात आली आहे, असं रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे.
 ‘रेल्वे प्रवाशांना रेल्वेच्या सगळ्या सुविधा एकाच अॅपवर मिळणं गरजेचं आहे. या नव्या अॅपच्या माध्यमातून रेल्वेच्या सुविधांसोबतच टॅक्सी बुकिंग, हॉटेल बुकिंग आणि विमानाच्या तिकिटाचं बुकिंगही करण्यात येणार आहे,’ असं त्या अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे.