शहरं
Join us  
Trending Stories
1
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
2
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
3
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
4
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
5
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
6
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
7
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
8
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
9
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
10
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
11
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
12
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
13
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
14
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
15
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
16
 आणखी किती हिंमत हवी...! पुतीनसमोर पत्रकारानं मैत्रिणीला केलं प्रपोज अन्..
17
कांजूर डम्पिंगच्या दुर्गंधीवर तोडगा काढा; मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश; स्वच्छ हवेत श्वास घेणे काळाची गरज : महत्त्वपूर्ण निरीक्षण
18
बापरे, पश्चिम रेल्वेवर एकदाचाच ३० दिवसांचा मेगाब्लॉक! १०० लोकल रद्द झाल्याने हाल 
19
आता लोकलच्या दारात लटकता येणार नाही; प्रयोग सुरु, कारण...
20
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

तीन ट्रेन एकाच ट्रॅकवर आल्याने अधिका-यांची उडाली झोप, मोठा अपघात होता होता टळला

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2017 14:46 IST

उत्तर प्रदेशातील अलाहाबदमध्ये मंगळवारी मोठी रेल्वे दुर्घटना टळली. अलाहाबाद स्टेशनजवळ दुरंतो एक्स्प्रेस सहित तीन ट्रेन एकाच वेळी ट्रॅकवर आल्या होत्या. रेल्वे अधिका-यांना माहिती मिळताच त्यांची झोप उडाली आणि धावपळ सुरु झाली

अलाहाबाद - उत्तर प्रदेशातील अलाहाबदमध्ये मंगळवारी मोठी रेल्वे दुर्घटना टळली. अलाहाबाद स्टेशनजवळ दुरंतो एक्स्प्रेस सहित तीन ट्रेन एकाच वेळी ट्रॅकवर आल्या होत्या. रेल्वे अधिका-यांना माहिती मिळताच त्यांची झोप उडाली आणि धावपळ सुरु झाली. यानंतर तात्काळ तिन्ही ट्रेन्स थांबवण्यात आल्या. मात्र अधिकृतपणे या माहितीला कोणी दुजोरा दिलेला नाही. 

दुसरीकडे सोमवारी दिल्ली - हावडा मार्गावरील सराय भूपत आणि जसवंतनगर रेल्वे स्थानकांदरम्यान एका मोठी रेल्वे दुर्घटना टळली. मिळालेल्या माहितीनुसार, दोन्ही स्थानकांदरम्यान रेल्वे ट्रॅक तुटला होता. ज्यामुळे शताब्दी आणि राजधानीसहित इतर ट्रेनही थांबवण्यात आल्या होत्या. अधिका-यांना तात्काळ घटनास्थळी धाव घेत रेल्वे ट्रॅकची दुरुस्ती करण्याचं काम केलं, आणि रेल्वे वाहतूक सुरळीत केली. 

मिळालेल्या माहितीनुसार, सकाळी 6.30 वाजता एका रेल्वे कर्मचा-याने रेल्वे ट्रॅक तुटला असल्याचं पाहिल्यानंतर तात्काळ अधिका-यांना कळवलं. अधिका-यांनीही रेल्वे प्रमुखांना ही माहिती दिली आणि यानंतर 9 वाजून 2 मिनिटांनी शताब्दी एक्प्रेस रवाना करण्यात आली. 

सुरेश प्रभू यांनी रेल्वेमंत्रिपद सोडले, पियुष गोयल नवे रेल्वे मंत्रीकाही दिवसांपूर्वी झालेल्या रेल्वे अपघातांची जबाबदारी स्वीकारत, रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी आपल्या पदाचा राजीनामा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे देऊ केला होता. मात्र मोदींनी त्यांचा राजीनामा न स्वीकारता  प्रभू यांना ‘थांबा’ असा सल्ला दिला होता. केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर सुरेश प्रभू यांच्या जागी पियूष गोयल यांच्याकडे रेल्वे मंत्रालय सोपवण्यात आले. तर सुरेश प्रभू यांच्याकडे पर्यावरण किंवा उर्जा मंत्रालय सोपण्यात येऊ शकते. 

उत्तर प्रदेशात १९ ऑगस्ट रोजी उत्कल एक्स्प्रेस रुळांवरून घसरून २३ जण ठार व ४00 लोक जखमी झाले. त्यानंतर,  पुन्हा उत्तर प्रदेशातच कैफियत एक्स्प्रेसच्या अपघातात ७0 हून अधिक प्रवासी जखमी झाले होते. अपघातानंतर रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष ए. के. मित्तल यांनी राजीनामा दिला. त्यानंतर, काही तासांनी सुरेश प्रभू यांनी पंतप्रधानांची भेट घेतली आणि त्यांनीही राजीनामाही सादर केला. मात्र, तो न स्वीकारता मोदी यांनी त्यांना थांबण्यास सांगितले होते. स्वत: सुरेश प्रभू यांनीच ट्विटरवरून ही माहिती दिली होती. ते म्हणाले होते की, या अपघातांमुळे आपण अतिशय दु:खी आहोत. जखमी झालेल्यांचे, तसेच मृतांच्या नातेवाईकांचे दु:ख पाहून मला त्रास झाला आहे. अपघात टळावेत व जनतेला चांगली रेल्वेसेवा मिळावी, यासाठी मी घाम गाळला व रक्त आटवले. रेल्वेत सुधारणेसाठी पंतप्रधानांच्या मार्गदर्शनाखाली अनेक पावले टाकली. मात्र, अपघातांची जबाबदारी स्वकारून मी राजीनामा सादर केला आहे. मात्र त्यानंतर पुन्हा मुंबईजवळील कसारा येथे दुरान्तो एक्स्प्रेसला मोठा अपघात झाला होता.  

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वेRailway Passengerरेल्वे प्रवासी