शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

'ती' भिंत कोसळल्यानं झालेल्या जीवितहानीमुळे तामिळनाडूतील 3 हजार दलित करणार धर्मांतर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2019 06:30 IST

इस्लाममध्ये प्रवेश; अस्पृश्यतेच्या भिंतीमुळे १७ जणांचा मृत्यू

कोइम्बतूर : अस्पृश्यतेचा फटका बसलेल्या नाडूर गावातील तीन हजार दलितांनी इस्लाममध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला असून, त्यापैकी दोन हजार दलित येत्या ५ जानेवारी रोजी हे धर्मांतर करणार आहेत. त्या गावात २ डिसेंबर रोजी झालेल्या पावसात भिंत कोसळून १७ जण ठार झाले होते. त्यानंतर त्यांनी हा निर्णय घेतला आहे.त्या गावातील शिवसुब्रमण्यन याने आपल्या शेजारी दलितांची घरे असू नयेत, म्हणून मध्येच एक भिंत बांधली होती. ती भिंत बांधताना पुरेशी काळजी घेतली नाही आणि २ डिसेंबरच्या पावसात ती भिंत कोसळली. त्याखाली दबून दलितांच्या तीन कुटुंबातील १७ जण ठार झाले होते. तेव्हापासून तिथे वाद चिघळला आहे.ही भिंत बांधणाऱ्या शिवसुब्रमण्यन याला पोलिसांनी अटक केली; पण त्याची काही दिवसांत जामिनावर सुटका करण्यात आली. मात्र, दुर्घटनेबद्दल आवाज उठवणाºया नागई तिरुवल्लूवन या स्थानिक दलित नेत्याला मात्र अद्यापही कारागृहात ठेवण्यात आले आहे. त्यामुळे नाडूर व आसपासच्या गावांतील दलित संतप्त आहेत. अस्पृश्यता पाळणाऱ्या व्यक्तीला अ‍ॅट्रॉसिटी कायद्याखाली अटक करण्याऐवजी आमच्याच नेत्याला पोलिसांनी डांबून ठेवले आहे, अशी त्यांची तक्रार आहे. शिवसुब्रमण्यनवर अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करा, अशी मागणी आम्ही वारंवार केली; पण राज्य सरकार व पोलीस दुर्लक्ष करीत आहेत. धर्मांतर करू इच्छिणारे बहुसंख्य दलित हे तामिळ पुळीगल कच्ची संघटनेचे सदस्य आहेत, तसेच ज्या कुटुंबांतील १७ जण भिंत कोसळून ठार झाले, तेही इस्लाममध्ये प्रवेश करू इच्छित आहेत. (वृत्तसंस्था)या धर्मात आम्हाला स्थानच नाहीतामिळ पुळीगल कच्ची या संघटनेचे सरचिटणीस इलावेन्नील म्हणाले की, भिंत कोसळून १७ जण मरणे ही उंटाच्या पाठीवरील शेवटची काडी होती. आमच्या जीवनाला हिंदू धर्मात काही किंमतच नसेल तर आम्ही या धर्मात राहायचे तरी का? हिंदू धर्माला आमची काळजी नसेल, तर आम्हालाही त्या धर्मात राहण्याची इच्छा नाही.

टॅग्स :Muslimमुस्लीम