शहरं
Join us  
Trending Stories
1
थर्टी फर्स्टचा जल्लोष पहाटेपर्यंत! हॉटेल आणि बार पहाटे ५ वाजेपर्यंत सुरू राहणार; राज्य सरकारचा मोठा निर्णय
2
Solapur Municipal Corporation Election 2025 : सोलापूरात मोठी राजकीय खेळी! ठाकरेंच्या जिल्हाप्रमुखाने ऐनवेळेला भाजपाकडून भरला फॉर्म
3
Stock Market Holiday 2026 List: NSE-BSE नं जारी केली २०२६ ची सुट्ट्यांची यादी; पाहा किती आहेत लाँग वीकेंड्स?
4
Panvel Municipal Election 2026: पनवेलमध्ये 'मविआ'ला झटका! भाजपाचे नितीन पाटील बिनविरोध, मतदानाआधीच तीन ठिकाणी फुललं 'कमळ'
5
संतापजनक! चालत्या कारमध्ये दोन तास लैंगिक अत्याचार, तरुणीला मारहाण; मध्यरात्री रस्त्यावर फेकून दिले
6
“काँग्रेसमुक्त भारतची वल्गना करणारा भाजपा ‘कार्यकर्ता मुक्त भाजपा’ झाला”: हर्षवर्धन सपकाळ
7
लालू यादवांचा मुलगा तेज प्रताप यादव यांची तब्येत अचानक बिघडली, रुग्णालयात दाखल, काय झालं?
8
इंदूरमध्ये दूषित पाण्याचा कहर, विषारी पाण्यामुळे आतापर्यंत ८ जणांचा मृत्यू, हजारो जण बाधित
9
DSP संतोष पटेल यांनी 26 वर्षांनंतर फेडले ‘रक्ताचे ऋण’; संतु मास्टरच्या कुटुंबाची जबाबदारी स्वीकारली
10
आईशी भांडली, रागाने घराबाहेर पडली, नराधमाच्या तावडीत सापडली; तरुणीसोबत घडलं भयंकर
11
ऐन मनपा निवडणुकीत मनसेला मोठा धक्का! माजी नगरसेवकांचा पक्षाला रामराम, शिंदे गटात प्रवेश
12
भारत तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था कधी बनणार; पाकिस्तानचा समावेश टॉप १० मध्ये आहे का?
13
आता कितीही धुके असू दे, वेगवान वंदे भारत ट्रेन थांबणार नाही; भारतीय रेल्वेने उचलले मोठे पाऊल!
14
कोण होती तातियाना श्लॉसबर्ग? अमेरिकन माजी राष्ट्राध्यक्षांच्या नातीचा ३५व्या वर्षी मृत्यू
15
वाजत-गाजत आघाडी केली, आता काँग्रेसला डोक्यावर हात मारायची वेळ आली; ‘वंचित’मुळे मोठा धक्का!
16
"अहंकार दुखावल्याने त्याने मलाच सिनेमातून काढून टाकलं...", बॉलिवूड दिग्दर्शकाकडून अक्षय खन्नाची पोलखोल
17
शिंदेसेनेत उफाळली नाराजी; ५०० हून अधिक होते इच्छुक
18
Video: मराठी तरुणाला २ तास डांबल्याचा आरोप, भाईंदर रेल्वेस्टेशनवरील प्रकार, नेमकं काय घडलं?
19
मुंबईत मतदानापूर्वीच दोन प्रभागातून महायुती बाद, प्रभाग क्र. २११ आणि २१२ मध्ये काय घडलं?
20
'मुस्लीम मुंबई' करण्याचं षडयंत्र हिंदू हाणून पाडेल; किरीट सोमय्यांचा ठाकरे बंधूंवर हल्लाबोल
Daily Top 2Weekly Top 5

तीन ठिकाणी चकमक : १३ अतिरेक्यांचा काश्मीरमध्ये खात्मा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2018 05:58 IST

दक्षिण काश्मिरात तीन ठिकाणी अतिरेक्यांविरुद्ध सुरू करण्यात आलेल्या मोहिमेत १३ अतिरेक्यांना ठार मारण्यात यश आले आहे. या चकमकीत तीन जवान शहीद झाले असून, चार नागरिकांचा मृत्यू झाला आहे. या घटनेबाबत पत्रकार परिषदेत माहिती देताना जम्मू-काश्मीरचे पोलीस महासंचालक एस. पी. वैद्य यांनी सांगितले की, काश्मीर खोऱ्यात सक्रीय अतिरेक्यांविरुद्ध हा अलीकडच्या काळातील सर्वात मोठा प्रतिहल्ला आहे.

श्रीनगर -  दक्षिण काश्मिरात तीन ठिकाणी अतिरेक्यांविरुद्ध सुरू करण्यात आलेल्या मोहिमेत १३ अतिरेक्यांना ठार मारण्यात यश आले आहे. या चकमकीत तीन जवान शहीद झाले असून, चार नागरिकांचा मृत्यू झाला आहे. या घटनेबाबत पत्रकार परिषदेत माहिती देताना जम्मू-काश्मीरचे पोलीस महासंचालक एस. पी. वैद्य यांनी सांगितले की, काश्मीर खोऱ्यात सक्रीय अतिरेक्यांविरुद्ध हा अलीकडच्या काळातील सर्वात मोठा प्रतिहल्ला आहे. सुरक्षा दलाने केलेल्या या हल्ल्याने हिज्बुल मुजाहिद्दीन आणि लष्कर-ए-तोयबा यांना मोठा झटका बसला आहे.अधिकाºयांनी सांगितले की, शोपियांच्या काचदुरू भागात झालेल्या चकमकीत सैन्याचे तीन जवान शहीद झाले. या ठिकाणाहून अतिरेक्यांचे तीन मृतदेह मिळाले आहेत. काचदुरू येथील मोहीम संपलेली आहे. सुरक्षा दल उद्या पुन्हा येथे तपास मोहीम राबविणार आहे.पोलीस महासंचालकांनी एका वरिष्ठ पोलीस अधीक्षकांच्या प्रयत्नांचाही या वेळी उल्लेख केला. दायलगाम चकमकीच्या वेळी वरिष्ठ पोलीस अधीक्षकांनी एका अतिरेक्याच्या नातेवाइकांना फोन केला. ते त्यांच्याशी ३० मिनिटे बोलले. जेणेकरून, या अतिरेक्याला आत्मसमर्पण करण्यासाठी तयार केले जावे. मात्र, या अतिरेक्याने आपल्या कुटुंबीयांचे म्हणणे ऐकलेनाही. या अतिरेक्याने पोलिसांच्या दिशेने फायरिंग केली. त्यानंतर, पोलिसांनी केलेल्या गोळीबारात हा अतिरेकीमारला गेला, तर अन्य एक जण जिवंत पकडला गेला.चकमकी नेमक्या कोठे?काश्मिरात द्रगादमध्ये झालेल्या चकमकीत मारले गेलेले सर्व सात अतिरेकी स्थानिक रहिवासी होते. याशिवाय शोपियांच्या काचदुरू भागात, तसेच दायलगाम भागात ही चकमक झाली.स्थानिक उतरले रस्त्यावरकाचदुरूतील चकमकीबाबत महासंचालकांनी सांगितले की, तेथे चार ते पाच अतिरेकी असल्याची माहिती आमच्याकडे होती. मात्र, येथील पूर्ण झडती झाल्यानंतरच त्याबाबत आम्ही सांगू शकू. शोपियां जिल्ह्यात एक आणि काचदुरूत एक अशा दोन नागरिकांचा मृत्यू झाला. काचदुरूत चकमक सुरू असताना हिंसाचार उसळला. यात पेलेट गनने २५ नागरिक जखमी झाले, तर ६ अन्य नागरिकांना गोळ्या लागल्या. द्रगादमध्ये झालेल्या चकमकीत मारले गेलेले सर्व सात अतिरेकी स्थानिक रहिवासी होते. त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांचे मृतदेह मागितले आहेत. शोपियांतही चकमकीच्या ठिकाणी मोठ्या संख्येने लोक एकत्र जमा झाले होते.लेफ्टनंट उमर फय्याज यांच्या मृत्यूचा बदलाअवंतिपुरातील व्हिक्टर फोर्स मुख्यालयात आयोजित या पत्रकार परिषदेला लेफ्टनंट जनरल ए. के. भट्ट उपस्थित होते.हे सर्वात मोठे अभियान होते, असे सांगून भट्ट म्हणाले की, लेफ्टनंट उमर फय्याजच्या मृत्यूचा बदला घेण्यात आला आहे. गतवर्षी मे महिन्यात अतिरेक्यांनी शोपियांत फय्याज यांना मारले होते.दक्षिण काश्मिरच्या शोपियां जिल्ह्यात हरमैन भागात त्यांचा मृतदेह आढळून आला होता. आज मारण्यात आलेल्या अतिरेक्यांत इश्फाक मलिक आणि रईस ठोकर यांचा समावेश आहे. फय्याज यांच्या हत्येसाठी हेचजबाबदार होते.

टॅग्स :terroristदहशतवादीJammu Kashmirजम्मू-काश्मीरIndian Armyभारतीय लष्कर