ऑनलाइन लोकमत
श्रीनगर, दि. ६ - जम्मू-काश्मीरमधील बारामुल्ला जिल्ह्यात शनिवारी सकाळी प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरून ( एलओसी) भारतीय हद्दीत घुसखोरी करणा-या तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात लष्कराला यश मिळाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार तीन दहशतवादी बारामुल्ला येथील टूट मार गल्ली येथून भारताच्या हद्दीत घुसण्याचा प्रयत्न करत होते. हे लक्षात येताच लष्काराच्या जवानांनी त्यांचा डाव उधळून लावला. त्यावेळी झालेल्या चकमकीदरम्यान तीन दहशतवादी ठार झाले. लष्कराची कारवाई अद्याप सुरूच आहे.
गेल्या पंधरा दिवसात भारतीय सीमेवर घुसखोरी करण्याचा दहशतवाद्यांचा हा तिसरा प्रयत्न आहे.