शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

तीन दहशतवाद्यांना घातले कंठस्नान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2018 06:42 IST

श्रीनगर : सुरक्षा दलाच्या जवानांशी शुक्रवारी झालेल्या चकमकीमध्ये तीन अतिरेकी ठार झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. पाकिस्तानातून घुसखोरीचे प्रयत्न जोरात ...

श्रीनगर : सुरक्षा दलाच्या जवानांशी शुक्रवारी झालेल्या चकमकीमध्ये तीन अतिरेकी ठार झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. पाकिस्तानातून घुसखोरीचे प्रयत्न जोरात सुरू असतानाच या दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात सुरक्षा दलांना यश आले.सध्या सुमारे ३०० अतिरेकी पाकिस्तानातून घुसण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यापैकी सुमारे २५० दहशतवादी नियंत्रणरेषेच्या जवळ आले असल्याने सुरक्षा दलाचे जवान डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवून आहेत. हे तिन्ही दहशतवादी गुरुवारी मध्यरात्रीनंतर बारामुल्ला जिल्ह्यातील उरी भागातील नियंत्रणरेषेजवळील गावातून कारने जात असताना संशय आल्याने त्यांना वाहन थांबविण्यास सांगण्यात आले. त्याबरोबर वाहनात बसलेल्या दहशतवाद्यांनी जवानांवर गोळीबार सुरू केला.त्याला त्याच पद्धतीने जवानांनी उत्तर दिले. मात्र शुक्रवारी पहाटेपर्यंत दोन्ही बाजूंनी गोळीबार सुरू होता. या चकमकीत तिन्ही दहशतवादी मारले गेले. त्यांच्या कारमधून चार एके-रायफली आणि दारूगोळा जप्त करण्यात आल्या. हे तिघेही पाकिस्तानातून घुसूनच आले होते, असे नंतर स्पष्ट झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. हे अतिरेकी कोणत्या संघटनेशी संबंधित होते, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. त्यांची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे. या चकमकीनंतर काश्मीरमधील सर्व सीमारेषा आणि नियंत्रणरेषेजवळ अधिक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. (वृत्तसंस्था)

टॅग्स :terroristदहशतवादी