शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

धावत्या ट्रेनमध्ये 'थ्री इडियट्स'नी केली महिलेची प्रसुती

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2019 17:14 IST

थ्री इडियट्स चित्रपटात दाखवण्यात आलेली गर्भवती महिलेची डिलिव्हरी तुम्हाला आठवत असेलच. पण असाच प्रकार चक्क धावत्या ट्रेनमध्ये घडला आहे.

ठळक मुद्देथ्री इडियट्स चित्रपटात दाखवण्यात आलेली गर्भवती महिलेची डिलिव्हरी तुम्हाला आठवत असेलच. पण असाच प्रकार चक्क धावत्या ट्रेनमध्ये घडला आहेरविवारी आगरतळा-हबीबगंज एक्स्प्रेस जलपैगुडीजवळ आली असताना एक महिला प्रसववेदनेने विव्हळत असल्याचे काही जणांनी पाहिले

कोलकाता - आमीर खानचा थ्री इडियट्स हा धम्माल चित्रपट पाहिला नाही, अशा व्यक्ती सापडणे विरळाच. या तीन मित्रांनी केलेल्या करामती आणि शेवटी केलेली गर्भवती महिलेची डिलिव्हरीही तुम्हाला आठवत असेलच. पण असाच प्रकार चक्क धावत्या ट्रेनमध्ये घडला आहे. पश्चिम बंगालमधील जलपैगुडी येथे चालत्या ट्रेनमध्ये प्रसववेदनेने विव्हळत असलेल्या असहाय महिलेची प्रसुती तीन मित्रांनी केल्याची घटना समोर आली आहे.  याबाबतची सविस्तर हकीकच अशी की, रविवारी आगरतळा-हबीबगंज एक्स्प्रेस जलपैगुडीजवळ आली असताना एक महिला प्रसववेदनेने विव्हळत असल्याचे काही जणांनी पाहिले. त्यावेळी त्या ट्रेनमधून प्रवास करत असलेले मोहम्मद सोहराब, त्रिभुवन सिंह आणि सुभेदार गडवा हे तीन मित्र या महिलेच्या मदतीसाठी पुढे आले. त्यांनी या महिलेची सुखरूप प्रसुती केली. या महिलेला प्रसुतीवेदना सुरू झाल्यावर ट्रेनमध्ये डॉक्टर आहे का याचा शोध सुरू झाला. मात्र या तिघांनाही ट्रेनमध्ये डॉक्टर सापडला नाही. अखेरीस त्यांनी सहप्रवाशांकडून काही कपडे आणि इतर सामान गोळा केले. नंतर  स्वत:च या महिलेची प्रसुती केली. सर्व व्यवस्थित पार पडल्यावर बाळाच्या रडण्याचा आवाज ऐकू आल्यावर सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला. मात्र बाळाचा जन्म झाल्यानंतर नाळ हटवणे आवश्यक असते. मात्र याबाबत कुणालाच अनुभव नव्हता. त्यामुळे साखळी ओढून ट्रेन थांबवण्याचा प्रयत्न केला. पण ट्रेन थांबली नाही. त्यानंतर सोहराब यांनी मदतीसाठी फोन केला. त्यावेळी जवळच असलेले रेल्वेचे गार्ड शंकर प्रसाद यांनी या महिलेच्या मदतीसाठी ब्रेक दाबून ट्रेन थांबवली. धुपगुडी स्टेशनजवळ ट्रेन थांबल्यानंतर एका स्थानिक डॉक्टराच्या मदतीने बाळाची नाळ वेगळी करण्यात आली. या सर्व गडबडीत ट्रेन एक तास लेट झाली.  

टॅग्स :west bengalपश्चिम बंगालIndian Railwayभारतीय रेल्वे