आव्हाणे अतिसार प्रकरणी तीन कर्मचारी निलंबित अधिकारी, ग्रा.पं. सदस्यांना नोटिसा : सदोष मनुष्यवधाबाबत कार्यवाहीचाही विचार
By admin | Updated: June 9, 2016 22:45 IST
जळगाव : आव्हाणे ता. जळगाव येथेे पसरलेल्या अतिसाराच्या साथप्रकरणी जिल्हा परिषद प्रशासनाने ग्रामविकास अधिकारी, कानळदा आरोग्य केंद्रांतर्गत कार्यरत आरोग्य सेविका व आरोग्य सेविक यांना गुरुवारी निलंबित केले आहे. तर आव्हाणे ग्रामपंचायत सदस्यांसह कानळदा आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. या प्रकरणी आरोग्य केंद्राचे दोषी अधिकारी व ग्रा.पं.चे पदाधिकारी यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यासंबंधी जि.प.प्रशासनाने कार्यवाही सुरू केली आहे.
आव्हाणे अतिसार प्रकरणी तीन कर्मचारी निलंबित अधिकारी, ग्रा.पं. सदस्यांना नोटिसा : सदोष मनुष्यवधाबाबत कार्यवाहीचाही विचार
जळगाव : आव्हाणे ता. जळगाव येथेे पसरलेल्या अतिसाराच्या साथप्रकरणी जिल्हा परिषद प्रशासनाने ग्रामविकास अधिकारी, कानळदा आरोग्य केंद्रांतर्गत कार्यरत आरोग्य सेविका व आरोग्य सेविक यांना गुरुवारी निलंबित केले आहे. तर आव्हाणे ग्रामपंचायत सदस्यांसह कानळदा आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. या प्रकरणी आरोग्य केंद्राचे दोषी अधिकारी व ग्रा.पं.चे पदाधिकारी यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यासंबंधी जि.प.प्रशासनाने कार्यवाही सुरू केली आहे. गावात पसरलेल्या अतिसाराच्या साथीमुळे २५ रुग्णांवर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू असून एका महिलेचा मृत्यू झाला आहे. सीईओ आस्तिककुमार पांडेय यांनी आव्हाणे येथे बुधवारी पाहणीदेखील केली. पाणीपुरवठ्यासंबंधी अनेक गंभीर बाबी आढळल्याने जि.प.प्रशासनाने ग्रामविकास अधिकारी डी.व्ही दोडके, आरोग्यसेवक ज्ञानेश्वर भिमराव चव्हाण (फुपनगरी आरोग्य उपकेंद्र), आरोग्यसेविका नज्जो बरकत पठाण यांना निलंबित केले आहे. तर ग्रामपंचायत सदस्य यांना ग्रा.पं. अधिनियम १९५८ चे कलम ४५ नुसार कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी १४३,१४४, १४४(अ) प्रमाणे नोटीस बजाविण्यात आली आहे. तसेच ग्रा.पं.सदस्यांवर भारतीय दंड संहिता कलम ३०४ नुसार सदोष मनुष्यवधाचा गुन्हा का दाखल करू नये याबाबत स्वतंत्र्य नोटीसही प्रशासनाने बजावली आहे.ग्रामपंचायत सदस्य तथा सरपंच वत्सलाबाई रामा मोरे, उपसंरपंच नामदेव पंुडलीक पाटील, छगन पांडुरंग पाटील, हर्षल प्रल्हाद चौधरी, सै.जहूर सै.अब्दुल , गोकुळराम ज्योतीराम सपकाळे, ग.भा.हिराबाई शांताराम ढोले, कमलबी शे.अजीज , सीमा गोपाल पाटील, प्रतिभा रघुनाथ नन्नवरे, शालीक बी अस्लम पिंजारी, कैलास मंगल पाटील, शोभा गोपाल चौधरी यांना नोटिसा बजाविण्यात आल्या आहे.तर कानळदा प्राथमिक आरोग्य केद्राचे वैदयकिय अधिकारी डॉ.मुरलीधर नारायण शेीवार यांनादेखील साथरोगसंबंधी पूर्व उपाययोजना न कारणे दाखवा नोटीस बजाविण्यात आलेली आहे.