शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

महामार्गावर तीन वाहने एकमेकांना धडकली विचित्र अपघात : शासकीय आयटीआयजवळ घडली घटना

By admin | Updated: April 26, 2016 00:16 IST

जळगाव : महामार्गावर तीन वाहने एकमेकांना धडकल्याची घटना सोमवारी सायंकाळी ६.१६ वाजेच्या सुमारास शासकीय आयटीआयजवळ घडली. या विचित्र अपघातात तीन वाहनांचे नुकसान झाले. मात्र, रात्री उशिरापर्यंत रामानंदनगर पोलीस ठाण्यात यासंदर्भात कोणताही गुन्हा अथवा नोंद करण्यात आलेली नव्हती.

जळगाव : महामार्गावर तीन वाहने एकमेकांना धडकल्याची घटना सोमवारी सायंकाळी ६.१६ वाजेच्या सुमारास शासकीय आयटीआयजवळ घडली. या विचित्र अपघातात तीन वाहनांचे नुकसान झाले. मात्र, रात्री उशिरापर्यंत रामानंदनगर पोलीस ठाण्यात यासंदर्भात कोणताही गुन्हा अथवा नोंद करण्यात आलेली नव्हती.
प्राप्त माहितीनुसार, खोटेनगरकडून आकाशवाणी चौकाच्या दिशेने जाणार्‍या (एमएच १८ डब्ल्यू ७११७) क्रमांकाच्या कार चालकाने मू.जे. चौकापासून काही अंतरावर गतिरोधक येण्यापूर्वी कारचा वेग कमी केला. याच वेळी कारच्या मागून वेगात येत असलेल्या (एमएच १९ बीएम ४५७१) क्रमांकाच्या मालवाहू चारचाकी चालकाला वेगावर नियंत्रण मिळवता न आल्याने तो कारवर मागून जाऊन धडकला. तर त्याच्या मागे चालणार्‍या दुसर्‍या (एमएच १५ सीके ४०६) क्रमांकाच्या चारचाकी चालकालाही दोन्ही वाहनात पुरेसे अंतर न ठेवता आल्याने ही चारचाकी पुढील चारचाकीवर जोरात जाऊन आदळली. या अपघातात सर्वात पुढे चालणार्‍या कारच्या मागील भागाचे तर सर्वात मागे चालणार्‍या चारचाकीचे बोनेट व रेडिएटरचे मोठे नुकसान झाले. या अपघातानंतर तिन्ही वाहन चालकांनी एकमेकांशी हुज्जत घातल्याने तणाव निर्माण झाला. तिन्ही वाहनांमधील मधल्या वाहनातून बांधकामाच्या लोखंडी सळ्या वाहून नेल्या जात होत्या. सुदैवाने त्या पुढील कार किंवा मागील चारचाकी वाहनात घुसल्या नाहीत. नाही तर मोठा अनर्थ होण्याची शक्यता होती.
वाहतूक विस्कळीत...
या अपघातामुळे महामार्गावर काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. या अपघाताची माहिती मिळाल्यानंतर शहर वाहतूक शाखेचे दोन कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले होते. त्यांनी वाहतूक सुरळीत करून वाहन चालकांमध्ये समझोता घडवून आणला. घटनास्थळी नागरिकांनीदेखील गर्दी केली होती.