शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

मोदीविरोधकांची एकता धोक्यात? लालूप्रसाद यादव यांच्या रॅलीपासून डावे राहणार दूर? 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2017 21:01 IST

नेहमीच भाजपा आणि संघविरोधी भूमिका घेणाऱ्या लालूप्रसाद यादव यांनी बिहारमधील सत्ता गेल्यानंतर आपला मोदीविरोध अधिकच तीव्र केला आहे. त्याचाच एक भाग म्हणून त्यांनी 27 ऑगस्टला विरोधी पक्षांची एकजुटता रॅली आयोजित केली आहे. मात्र ही रॅली आयोजित होण्यापूर्वीच मोदीविरोधी पक्षांमध्ये फूट पडल्याची चिन्हे दिसू लागली आहेत.  

कोलकाता, दि. 21 -  नेहमीच भाजपा आणि संघविरोधी भूमिका घेणाऱ्या लालूप्रसाद यादव यांनी बिहारमधील सत्ता गेल्यानंतर आपला मोदीविरोध अधिकच तीव्र केला आहे. त्याचाच एक भाग म्हणून त्यांनी 27 ऑगस्टला विरोधी पक्षांची एकजुटता रॅली आयोजित केली आहे. मात्र ही रॅली आयोजित होण्यापूर्वीच मोदीविरोधी पक्षांमध्ये फूट पडल्याची चिन्हे दिसू लागली आहेत.  बीजेपी हटाव देश बचाव असा नारा देत आयोजित होणाऱ्या या रॅलीपासून डावे पक्ष आणि तृणमूल काँग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी दूर राहण्याची शक्यता आहे.  राष्ट्रीय जनता दलाचे नेते लालूप्रसाद यादव यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत. त्यामुळे भ्रष्टाराचे आरोप असलेल्या नेत्यांसोब एकाच मंचावर येण्याची डावे नेते आणि ममता बॅनर्जी यांची इच्छा नाही. त्यामुळे ही मंडळी लालूप्रसाद यादव यांच्या या रॅलीपासून दूर राहण्याची शक्यता आहे. दरम्यान बसपाच्या नेत्या मायावती यासुद्धा या रॅलीपासून दूर राहण्याची चिन्हे आहेत.  भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या नेत्यांसोबत मंचावर येणे डाव्या पक्षांना अडचणीचे वाटत आहे. त्यामुळे हे पक्ष या रॅलीत सहभागी होण्याबाबत साशंकता आहे. मात्र गेल्या गुरुवारी शरद यादव यांमी संसद भवनात आयोजित केलेल्या विरोधी पक्षांच्या रॅलीत डावे पक्ष उपस्थित होते. पण डावे पक्ष नसले तरी अनेक प्रादेशिक पक्ष आणि काँग्रेसने या रॅलीत सहभागी होण्याचे संकेत दिले आहेत. या रॅलीत काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी सहभागी होणार असल्याचे राष्ट्रीय जनता दलाच्या एका नेत्याने सांगितले.  अधिक वाचा  लालू प्रसाद यादव यांच्या रॅलीत सहभागी झाले तर शरद यादवांवर कारवाई करणार - जेडीयूलालू प्रसाद यादव गोत्यात! सीबीआयने दाखल केला गुन्हाVIDEO : ...अन् थोडक्यात बचावले लालू प्रसाद यादव दरम्यान 27 ऑगस्ट रोजी राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालू प्रसाद यादव यांनी आयोजित केलेल्या रॅलीत शरद यादव सहभागी होण्याची शक्यता आहे. तसं झाल्यास तुमच्यावर कारवाई करण्यात येईल असा अप्रत्यक्ष इशाराच जेडीयूकडून देण्यात आला आहे.  जेडीयूचे सरचिटणीस के सी त्यागी यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं आहे की, 'शरद यादव यांचं पक्षाशी असलेलं जुनं नातं आणि वरिष्ठ नेते असल्याने पक्षविरोधी गोष्टी करुनही त्यांच्यावर कारवाई करण्यात आलेली नाही. मात्र 27 ऑगस्ट रोजी होणा-या लालू प्रसाद यादव यांच्या रॅलीत शरद यादव उपस्थित राहिले, तर ते लक्ष्मणरेषा पार करतील'. के सी त्यागी यांनी एकाप्रकारे कारवाई करण्याचा इशाराच दिला आहे.  शरद यादव यांनी स्वत:हून पक्षा सोडण्याचा निर्णय घेतला आहे. ना शारिरीक, ना भावनिक कोणत्याही प्रकारे ते आमच्यासोबत नाहीत असंही त्यागी बोलले आहेत. आपले समर्थक आणि आरजेडी सदस्यांसोबत बैठक घेऊन शरद यादव यांनी पक्षविरोधी कारवाया केल्या असल्याचा आरोप त्यागी यांनी यावेळी केला. 'शरद यादव यांनी नेहमीच नितीश कुमार यांच्याविरोधात भूमिका घेतली. मग ती नोटाबंदी असो, सर्जिंकल स्ट्राईक असो किंवा महिला आरक्षण. दरवेळी त्यांनी नितीश कुमारांविरोधात भूमिका घेतली, आणि अंतिम टोक गाठलं', असंही त्यागी यांनी सांगितलं. 

टॅग्स :Lalu Prasad Yadavलालूप्रसाद यादव