शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

कुलभूषण जाधव यांचा खटला न लढण्याची वकिलांना धमकी

By admin | Updated: April 14, 2017 16:23 IST

भारतीय नागरिक कुलभूषण जाधव यांचा खटला जो कोणी वकील लढेल त्याच्याविरोधात कारवाई केली जाईल

ऑनलाइन लोकमत
लाहोर, दि. 14 - भारतीय नागरिक कुलभूषण जाधव यांचा खटला जो कोणी वकील लढेल त्याच्याविरोधात कारवाई केली जाईल असं लाहोर उच्च न्यायालयाच्या बार असोसिएशनने म्हटलं आहे. लाहोर उच्च न्यायालय बार असोसिएशनचे सचिव जनरल आमेर सईद रान यांनी शुक्रवारी एका बैठकीनंतर ही माहिती दिली. बार असोसिएशनने पाकिस्तान सरकारला कोणत्याही परदेशी ताकदीसमोर न झुकण्याचं आवाहन केलं आहे. 
 
""जाधव हे भारतीय नागरिक असल्याचं भारताने मान्य केलं असून त्यांना सोडवण्यासाठी पाकिस्तानवर दबाव आणण्याचा प्रय़त्न करत आहे. पाकिस्तानी नागरिकांच्या जीवाशी खेळणा-या गुप्तहेराला वाचवलं जाऊ नये, सरकारने त्याला फाशी द्यावी"" अशी मागणी सईद यांनी केली. 
 
दरम्यान, इस्लामाबादमधील भारतीय उच्चायुक्त गौतम बंबावले पाकिस्तानचे परराष्ट्र सचिव तहमीना जनजुआ यांच्यासोबत जाधव प्रकरणावर भेट घेणार असल्याचं वृत्त आहे. या प्रकरणी गेल्या वर्षी पाकिस्तानने भारताकडून करण्यात आलेल्या 13 अपील फेटाळल्या होत्या.  
अशाप्रकारे भारताला टाळता येईल कुलभूषण जाधवांची फाशी-
पाकिस्तानच्या लष्करी न्यायालयाने सोमवारी कुलभूषण जाधव यांना  फाशीची शिक्षा सुनावली. त्यानंतर भारताकडून यावर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत.  जाधव यांना फाशी झाल्यास तो हत्येचा पूर्वनियोजित कट ठरेल अशा शब्दात भारताने पाकिस्तानला ठणकावले आहे. भारताचे परराष्ट्र सचिव एस. जयशंकर यांनी पाकिस्तानी उच्चायुक्त अब्दुल बासित यांना बोलावून विरोधाचे पत्र देऊन चांगलेच खडसावले. या पत्रात भारताने कुलभूषण जाधव यांना शिक्षा सुनावली जाताना अनेक कायदेशीर हक्कांची पायमल्ली केल्याचं म्हटलं आहे.   
 
काय आहेत पर्याय-
 
-कुलभूषण यांना कायदेशीर मदत न दिल्याचा आरोप भारताने केला आहे. त्यामुळे योग्य ती कायदेशीर मदत मिळाल्यास फाशीच्या शिक्षेविरोधात पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयात दाद मागू शकतो.
 
-ज्याप्रकारे पाकिस्तानने वर्षभराच्या आत खटला चालवत तडकाफडकी फाशीची शिक्षा सुनावली त्यामुळे जाधव यांच्या अनेक कायदेशीर हक्कांची पायमल्ली झाली. हा मुद्दा आंतरराष्ट्रीय स्थरावर योग्यप्रकारे मांडून आणि संयुक्त राष्ट्रात हा मुद्दा उचलून धरल्यास पाकिस्तानवर दबाव निर्माण होऊ शकतो.
 
-कूटनीतीचा वापर करून पाकिस्तानवर दबाव वाढवण्याचा भारताकडे पर्याय आहे. पाकिस्तानच्या वर्मावर बोट ठेवून कुलभूषण यांना न्याय मिळण्याची अपेक्षा भारत ठेवू शकतो.
 
- याशिवाय सर्वात महत्वाचा पर्याय म्हणजे दोन्ही देशांच्या प्रमुखांनी म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांनी या प्रकरणी हस्तक्षेप करून चर्चा करावी, या मुद्यावरून दोन्ही देशांतील संबंध आणखी ताणले जाऊ नयेत यासाठी जाधव यांची फाशी रद्द करण्याचा निर्णय होऊ शकतो.