शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

‘पप्पू’साठी भाजपकडून हजारो कोटी रुपयांचा खर्च, पण सत्य नेहमीच समोर येतं- राहुल गांधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2023 06:45 IST

भाजप व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने आपली प्रतिमा डागाळण्यासाठी हजारो कोटी रुपये खर्च केले

जम्मू :

भाजप व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने आपली प्रतिमा डागाळण्यासाठी हजारो कोटी रुपये खर्च केले; परंतु, सत्य नेहमीच समोर येते, असे काँग्रेस  नेते राहुल गांधी यांनी मंगळवारी येथे म्हटले. सोशल मीडियावर आपल्याला उपहासात्मकपणे पप्पू संबोधण्यात येत असल्याबद्दल ते बोलत होते. राहुल म्हणाले की, या देशात पैसा, सत्ता आणि अहंकार नाही तर सत्याचा विजय होतो हे काँग्रेस सत्ताधारी भाजप शिकवेल, असे ते म्हणाले.

सत्य लपविता येत नाहीबीबीसीवरील एका व्हिडीओवरून चर्चा सुरू असताना राहुल गांधी यांनी म्हटले आहे की, कोणतीही बंदी अथवा लोकांना घाबरवून सत्य समोर येण्यापासून रोखले जाणार नाही. ते म्हणाले की, जर आपण वेद, भगवद्गीता वाचली तर हे लक्षात येईल की, सत्य लपविता येत नाही. सत्य समोर येतेच. 

‘भारत जोडो’त अभिनेत्री उर्मिला मातोंडकर  - अभिनेत्री ते राजकारण असा प्रवास करणाऱ्या उर्मिला मातोंडकर यांनी मंगळवारी सकाळी कडाक्याच्या थंडीत जम्मूत भारत जोडो यात्रेत सहभाग घेतला. - उर्मिला यांनी २०१९ मध्ये काँग्रेसचा राजीनामा दिला होता आणि २०२० मध्ये शिवसेनेत प्रवेश केला होता. पदयात्रेत त्या राहुल गांधी यांच्यासोबत चर्चा करताना दिसून आल्या.

‘दिग्विजयसिंह यांच्या विधानाशी सहमत नाही’- सशस्त्र दलांना कोणतेही पुरावे दाखवण्याची गरज नाही, असे सांगून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पक्ष सर्जिकल स्ट्राइकवरील ज्येष्ठ नेते दिग्विजयसिंह यांच्या विधानांशी सहमत नसल्याचे मंगळवारी स्पष्ट केले. सिंह यांनी सोमवारी ‘सर्जिकल स्ट्राइक’वर प्रश्नचिन्ह उपस्थित करत सरकार खोटे बोलत असल्याचा आरोप केला होता.- ‘मी दिग्विजयसिंह यांच्या विधानाशी सहमत नाही. ते त्यांचे वैयक्तिक मत आहे. आम्ही त्यांच्याशी असहमत आहोत आणि ही काँग्रेसची अधिकृत भूमिका आहे, असे राहुल यांनी येथे पत्रकारांना सांगितले. आमचा लष्करावर पूर्ण विश्वास असून, सशस्त्र दलांना त्यांच्या कामगिरीचा कोणताही पुरावा देण्याची गरज नाही,’ असे ते म्हणाले.  

टॅग्स :Bharat Jodo Yatraभारत जोडो यात्राRahul Gandhiराहुल गांधी