हजारो अवैध रिक्षा वैध करणार
By admin | Updated: June 15, 2015 21:29 IST
हजारो अवैध रिक्षा वैध करणार
हजारो अवैध रिक्षा वैध करणार
हजारो अवैध रिक्षा वैध करणार-परिवहन विभागाचीमाफी योजना लवकरचमुंबई - राज्यातील १ लाख ५६ हजार अवैध रिक्षा लवकरच वैध ठरणार आहेत. परवान्यांचे नूतनीकरण न केल्याने अवैध ठरलेल्या रिक्षांपैकी बव्हंशी आजही रस्त्यावर फिरतात. त्यांना वैध करून दिलासा देण्याचा प्रयत्न असल्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी आज पत्रपरिषदेत सांगितले.ते म्हणाले की, नूतनीकरणासाठी शुल्काबाबत सवलत देऊन हे परवाने वैध केले जातील. त्यासाठी एकदाच संधी दिली जाईल. हजारो तरुण या व्यवसायात आहेत. त्यांना दिलासा देण्यासाठी हा निर्णय घेण्यात येणार आहे. नवीन टॅक्सी/रिक्षा परवाने देण्याची बाब विचाराधीन आहे. टॅक्सी/रिक्षांविरुद्धधडक कारवाईमुंबई, ठाणे, पुणे आणि पनवेलच्या परिवहन कार्यालयामार्फत टॅक्सी/रिक्षा तपासणीची धडक मोहीम १ ते १५ जूनदरम्यान राबविण्यात आली. तीत १ हजार २७५ टॅक्सी व ३ हजार ७६० रिक्षा दोषी आढळले. अवैध प्रवासी वाहतूक, वैध प्रमाणपत्रे नसणे, वैध विमा, वैध पीव्हीसी नसणे, भाडे नाकारणे, नोंदणी रद्द झालेल्या वाहनांचा वापर या त्रुटी आढळल्याची माहिती परिवहन आयुक्त सोनिया सेठी यांनी या पत्रपरिषदेत दिली. (विशेष प्रतिनिधी)------------------------------------------टॅक्सी,रिक्षा थांबलीनाहीतर कारवाईबरेचदा रिकामी टॅक्सी वा रिक्षा तुम्ही विनंती करूनही थांबत नाही. प्रवासी हतबल होतो पण आता अशा उद्दाम टॅक्सी/रिक्षाचालकांवर कारवाई होणार आहे. भाडे नाकारणार्याच्या टॅक्सी/रिक्षाचा मोबाइलवर फोटो काढा आणि परिवहन विभागाच्या ॲपवर पाठवा. परिवहन विभागाकडून काय कारवाई झाली ते तुम्हाला कळविले जाईल. ही यंत्रणा लवकरच कार्यान्वित केली जाईल, असे विभागाच्या वरिष्ठ अधिकार्यांनी सांगितले. -----------------------------------------