हजारोंनी दिली भेट-
By admin | Updated: April 26, 2016 00:16 IST
जनमंच युवा प्रदर्शन
हजारोंनी दिली भेट-
जनमंच युवा प्रदर्शन--------------------- - स्टॉलधारकही सुखावले उत्तम आणि अतिशय सुरेख आयोजन असल्याची पावती सहभागी स्टॉलधारकांनी दिली. दोन्ही दिवस नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. त्यांनी मोठ्या प्रमाणावर खरेदी केल्याने स्टॉलधारकही सुखावले. राजेश भारद्वाज या स्टॉलधारकाने सांगितले की, मी अनेक प्रदर्शनामध्ये सहभाग घेतला, परंतु या प्रदर्शनाचे आयोजन अतिशय चांगले होते. विशेषत: तरुण स्वयंसेवकांनी ज्या पद्धतीने काम केले, त्यामुळे आम्हाला कसलीही अडचण भासली नाही. - तरुण स्वयंसेवकांच्या परिश्रमाचे यश जनमंच युवा ही जनमंच या सामाजिक संघटनेची युवा शाखा आहे. जनमंचप्रमाणेच युवा शाखेनेसुद्धा सामाजिक जाणिवेतून या प्रदर्शनाचे आयोजन केले होते. तरुणांनी एकत्र येऊन केलेला हा पहिलाच प्रयत्न होता आणि तो या तरुणांनी आपल्या मेहनतीने यशस्वी करून दाखविला. यासाठी वरद किलोर, रोहन देव, मितीन वैद्य, श्रेया अभ्यंकर, सृष्टी रॉय, श्रेया क्षीरसागर, सुयश करकरे, सकीना दाऊद, श्लोका सोनकांबळे, वरुण शहा, रसिका बांगरे, संभवी पांडे, प्रसाद गुप्ता, अजिंक्य हांडे, ब्रिजेश माहेश्वरी, दीपेश मोटवानी या तरुणांनी विशेष परिश्रम घेतले. -------