शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
Thane: ट्रेकिंगला गेले असता पाय घसरुन दरीत कोसळला, ठाण्यातील धक्कादायक प्रकार!
4
प्रवाशांना मार्गदर्शक सूचना द्या, रेल्वे नोडल अधिकारी नेमा, यंत्रणांना निर्देश
5
आजचा अग्रलेख: मारेकऱ्यांच्या मुसक्या आवळा!
6
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
7
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
8
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
9
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
10
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
11
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
12
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
13
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
14
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
15
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
16
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
17
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
18
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
19
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद

भगवान बाहुबलींचे १५ लाख भाविकांनी घेतले दर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2018 05:54 IST

येथील भगवान बाहुबली स्वामी महामस्तकाभिषेक महोत्सवात ७ फेब्रुवारीपासून आजअखेर तब्बल १५ लाख भाविकांनी हजेरी लावली.

शीतल पाटीलश्रवणबेळगोळ : येथील भगवान बाहुबली स्वामी महामस्तकाभिषेक महोत्सवात ७ फेब्रुवारीपासून आजअखेर तब्बल १५ लाख भाविकांनी हजेरी लावली. मुख्य मस्तकाभिषेकाला सुरुवात झाल्यापासून भाविकांसह राजकीय नेते, लोकप्रतिनिधींची गर्दी वाढू लागली आहे. मंगळवारी चौथ्या दिवशी १००८ कलशांनी बाहुबलींच्या मूर्तीवर पंचामृत अभिषेक करण्यात आला.चारुकीर्ती भट्टारक स्वामी यांच्या नेतृत्वाखाली सुरू झालेला हा महोत्सव २६ फेब्रुवारीपर्यंत चालणार आहे. सुरुवातीला पंचकल्याण विधी पार पडला. या वेळी ८ ते ९ लाख भाविक सहभागी झाले होते. मस्तकाभिषेकाला सुरुवात झाल्यापासून भाविकांची गर्दी वाढू लागली आहे. कर्नाटक, महाराष्ट्र, राजस्थान, गुजरात, कोलकाता, दिल्ली, मध्य प्रदेश या राज्यांतून भाविक बाहुबलींच्या दर्शनाला येत आहेत. आतापर्यंत १५ लाख लोकांनी सोहळ्याला उपस्थिती लावल्याचे महोत्सव समितीचे राष्ट्रीय सचिव सुरेश पाटील यांनी सांगितले. रविवार, सोमवारी सलग सुटीमुळे लक्षणीय गर्दी झाली होती. विंध्यगिरी पर्वतासोबतच चंद्रगिरी पर्वतावरही दर्शनासाठी रांगा लागल्या आहेत. चंद्रगिरीवरून मस्तकाभिषेक पाहण्याची सोय केली आहे. तेथे येणाºया लोकांना लिंबू-सरबताचे वाटप केले जात आहे. चंद्रगिरीवर चिन्मयसागर महाराज (जंगलवाले बाबा) यांचे प्रवचन होत आहे.