थिवी ते म्हापसा सब स्टेशन वीज
By admin | Updated: July 18, 2015 01:12 IST
वाहिन्याचे काम चतुर्थीपूर्वी
थिवी ते म्हापसा सब स्टेशन वीज
वाहिन्याचे काम चतुर्थीपूर्वी म्हापसा:थिवी ते म्हापसा सब स्टेशन पर्यंतच्या वीज वाहिन्याचे काम गणेश चतुर्थीपूर्वी पूर्ण करण्याची परवानगी वीज खात्याला देण्यात आल्याने या कामामुळे म्हापशातील विजेच्या समस्येवर तोडगा निघणे शक्य होईल.थिवी सब स्टेशन ते म्हापसा सब स्टेशन पर्यंत ३३ केव्ही वीज वाहिनी जमिनीखालून घालण्याचे काम चालू होते; पण पावसाळा सुरु झाल्यानंतर उत्तर गोवा जिल्हाधिकार्यांनी दिलेल्या आदेशानंतर हे काम बंद ठेवण्यात आले होते. कामाचे महत्व ओखळून खात्याने काम पूर्ण करण्यास परवानगी द्यावी अशी मागणी जिल्हाधिकार्यांकडे केली होती. केलेल्या मागणीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकार्यांनी काम पूर्ण करण्यास परवानगी दिली, अशी माहिती कार्यकारी अभियंता सी राजागोपालन यांनी दिली. अर्धवट राहिलेल्या या कामामुळे बरेच प्रश्न खात्यासमोर निर्माण झाले होते; पण दिलेल्या आदेशनंतर म्हापशातील वीज समस्येवर तोडगा निघणे शक्य होईल असे ते म्हणाले. या कामावर अंदाजीत १० कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. (खास प्रतिनिधी)