शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

‘लोकांशी जुळण्याचा हा स्तुत्य प्रयत्न’; सरन्यायाधीशांच्या गुजरातीत भाषणाचे पंतप्रधानांना कौतुक

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2024 06:19 IST

राजकोटमधील नवीन जिल्हा न्यायालयाच्या इमारतीचे उद्घाटन

राजकोट: सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी राजकोटमधील नवीन जिल्हा न्यायालयाच्या इमारतीचे उद्घाटन केले. यावेळी त्यांनी गुजराती भाषेत बोलून लोकांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. आपल्या भाषणात नर्म विनोदाची पेरणी करत गुजराती समाजाच्या ‘जिलेबी-फाफडा’ प्रेमाविषयीही सांगितले. यावर पंतप्रधाननरेंद्र मोदी स्वत:ला त्यांची प्रशंसा करण्यापासून रोखू शकले नाहीत.

कार्यक्रमादरम्यान चंद्रचूड यांनी गुजरातमधील लोकांमधील सांस्कृतिक वारसा आणि उद्योजकीय भावनेतील अभिमानाच्या अद्वितीय मिश्रणाची प्रशंसा केली. सरन्यायाधीश म्हणाले की, राजकोटचे लोक बदल आणि आधुनिकतेचा अंगीकार करताना त्यांच्या सांस्कृतिक परंपरांशी जोडलेले राहतात. एक गुजराती चहा ब्रेकला बिझनेस स्ट्रॅटेजी मीटिंगमध्ये बदलू शकतो. येथे उद्योजकतेचा अंगभूत भाव जीवनाच्या प्रत्येक अंगात उलगडला जातो. विनोद बाजूला ठेवू, गुजरातच्या प्रगतीचे मूळ सार हेच आहे. संस्कृतीला नावीन्याची सांगड घालण्याची क्षमता हाच खरा विकास आहे.

सरन्यायाधीशांनी गुजरातच्या प्रसिद्ध जिलेबी-फाफडाचाही उल्लेख केला. गुजरातमधील अनेक उद्योगांप्रमाणेच जिलेबी-फाफडाचेही स्थान आहे, असे ते म्हणाले.

एकाच छताखाली ३९ न्यायालये

राजकोटची नवीन जिल्हा न्यायालयाची इमारत पाच मजली आहे. यात कोर्ट रूम, न्यायाधीशांसाठी एक खोली, व्हिडीओ कॉन्फरन्सिंग हॉल, सरकारी वकिलांसाठी खोली, कॅन्टीन, लायब्ररी आणि बार रूम आहे. ही नवीन जिल्हा न्यायालयाची इमारत राजकोटच्या लोकांसाठी अत्यंत महत्त्वाची आहे. कारण यापूर्वी शहरभर पसरलेली ३९ न्यायालये आता एकाच छताखाली काम करणार आहेत.

त्यांना राजकोट चांगले समजले: मोदी

पंतप्रधाननरेंद्र मोदी यांनी देखील चंद्रचूड यांचे कौतुक केले. एक्सवर एका पोस्टमध्ये चंद्रचूड यांच्या या प्रयत्नाचे पंतप्रधानांनी कौतुक केले. एक व्हिडीओ शेअर करताना पीएम मोदींनी त्यांच्या पोस्टमध्ये लिहिले की, ‘आमच्या सर्वोच्च न्यायालयाच्या माननीय सरन्यायाधीशांना राजकोट चांगले समजले आहे! गुजरातीमध्ये बोलण्याचा आणि लोकांशी जोडण्याचा त्यांचा हा स्तुत्य प्रयत्न आहे.

टॅग्स :GujaratगुजरातDY Chandrachudडी. वाय. चंद्रचूडprime ministerपंतप्रधानNarendra Modiनरेंद्र मोदी