शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

विरोधकांकडून हीच होती केंद्राला अपेक्षा; नवीन संसद भवनाच्या उद्घाटनावरून आरोप-प्रत्यारोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2023 06:02 IST

- संजय शर्मा लोकमत न्यूज नेटवर्क नवी दिल्ली : नवीन संसद भवनाच्या उद्घाटन समारंभावर विरोधी पक्षांनी बहिष्कार घालण्याच्या घोषणेवर मोदी ...

- संजय शर्मालोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : नवीन संसद भवनाच्या उद्घाटन समारंभावर विरोधी पक्षांनी बहिष्कार घालण्याच्या घोषणेवर मोदी सरकारकडून तीव्र प्रतिक्रिया समोर आली आहे. सरकारमधील ज्येष्ठ मंत्र्यांनी म्हटले आहे की, विरोधकांकडून हीच अपेक्षा होती. ज्या दिवशी नवीन संसद भवनाचे काम सुरू झाले होते, त्या दिवसापासून विरोधी पक्ष विरोध करत आहेत. वास्तविक पाहता नवीन संसद भवन उभारण्याची गरज असल्याचा निर्णय काँग्रेसच्या यूपीए सरकारचा आहे. त्यावेळी मीराकुमार लोकसभा अध्यक्ष होत्या.विरोध होत असला तरी त्याकडे लक्ष न देता मोदी सरकार हा क्षण ऐतिहासिक करण्याची तयारी सुरू आहे. आम्हाला १६ हून अधिक पक्षांच्या लोकसभेच्या ३७७ आणि राज्यसभेच्या १२१ खासदारांचा पाठिंबा असल्याचा दावा सरकारने केला आहे. मायावती अप्रत्यक्षपणे भाजपला मदत करीत असल्या तरी सत्ताधारी पक्षाला हा पाठिंबा अनपेक्षित होता.

म्हणून राष्ट्रपतींना  दूर ठेवले : काँग्रेसकेवळ एका व्यक्तीचा अहंकार आणि स्वयंप्रसिद्धीसाठी नव्या संसदेच्या उद्घाटनापासून देशाच्या पहिल्या आदिवासी महिला राष्ट्रपतींना दूर ठेवले, असा आरोप कॉंग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केला.

नवीन संदेशn भाजपचे सर्व ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्र्यांना या कार्यक्रमात सहभागी होण्याचे निर्देश दिले आहेत. २८ मे रोजी नवीन संसद भवनाच्या उद्घाटनाबरोबरच मोदी सरकारची ९ वर्षे पूर्ण होत असल्याबद्दल आयोजित कार्यक्रमांचा प्रारंभ होईल. n देशात आता नवीन राज्य कायम झाले आहे व हे स्वतंत्र भारताने स्वत: निर्माण केलेले आणि निवडलेले आहे, हा संदेश यातून पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजप आपल्या मतदारांना देण्याचा प्रयत्न करत आहेत.

ते कोणत्या तोंडाने कार्यक्रमाला येणार : भाजपसरकारमधील एका ज्येष्ठ मंत्र्याने सांगितले की, काँग्रेस व विरोधी पक्षांकडून कोणती अपेक्षा करणार? ते कोणत्या तोंडाने कार्यक्रमाला येणार? जे काम त्यांना ७० वर्षांपूर्वी करायला पाहिजे होते, ते काम आज नरेंद्र मोदी यांनी केले आहे, ते त्यांना सहन होत नाही. गुलामीच्या खुणा हटवून स्वतंत्र भारताच्या आजच्या व भविष्याच्या आवश्यकतेला अनुरूप नवीन संसद तयार केली आहे.

टॅग्स :Parliamentसंसद