शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

हे अर्थसंकल्पीय अधिवेशन गदारोळ करणाऱ्यांसाठी पश्चात्तापाची संधी..., हातची सोडू नका - PM मोदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2024 11:17 IST

ज्यानी सभागृहात उत्तम विचार मांडले असेतील, ते आजही फार मोठ्या वर्गाच्या स्मरणात असतील, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. ते पत्रकारांसोबत बोलत होते.

आज अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात होत असताना. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे मार्गदर्शन आणि उद्या निर्मला सीतारमण यांच्याकडून अंतरीम अर्थसंकल्प, एक प्रकारे नारीशक्तीच्या साक्षात्काराचे पर्व आहे. मी असे मानतो की, गेल्या दहा वर्षांत ज्यांन-ज्यांना जो-जो मार्ग सुचल्या. त्या प्रकारे संसदेत सर्वांनी आपापले कार्य केले. मात्र, मी एवढे नक्कीच म्हणेत, की ज्यांचा गदारोळ करण्याचा स्वभावच झाला आहे. जे सवयीने लोकशाही मूल्यांचे वस्त्रहरण करतात, असे सर्व माननीय खासदार, आज जेव्हा अखेरच्या सत्रात एकत्र येत आहेत, तेव्हा नक्कीच आत्मपरीक्षण करतील की, त्यांनी गेल्या 10 वर्षांत जे केले, हवे तर आपल्या लोकसभा मतदार संघातही 100 लोकांना विचारावे. कुणालाही आठवत नसेल, कुणाला नावही माहीत नसेल, ज्यांनी गदारोळ केला. पण, विरोधाचा स्वर तिखट जरी असला, तरी ज्यानी सभागृहात उत्तम विचार मांडले असतील, ते आजही फार मोठ्या वर्गाच्या स्मरणात असतील, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. ते अधिवेशनाच्या सुरुवातीला पत्रकारांसोबत बोलत होते.

मोदी म्हणाले, "येणाऱ्या काळात सभागृहातील चर्चा कुणी बघेल, तेव्हा त्यांचा एक एक शब्द इतिहास म्हणून नोंदवला जाईल. मग भलेही ज्यांनी विरोध केला असेल, मात्र बुद्धी प्रतिभा दाखवली असेल, आमच्या विरोधात कठोर शब्दात मतं मांडली असतील. मी मानतो की, देशातील एक मोठा वर्ग, लोकशाही प्रेमी या व्यवहाराचे कौतुक करत असेल. पण, ज्यांनी केवळ नकारात्मकता आणि केवळ गदाररोळच केला असेल त्यांना क्वचितच कुणी स्मरणात ठेवेल."

"आता हे अर्थसंकल्पीय अधिवेशन एक संधी आहे, पश्चात्तापाचीही संधी आहे. काही चागल्या गोष्टी सोडण्याचीही संधी आहे. मी अशा सर्वच खासदारांना आग्रह करेल की, आपण ही संधी सोडू नका. चांगल्यात चांगले परफॉर्म करा. देश हितार्थ चांगल्यात चांगले विचार सभागृहात मांडा," असेही मोदी म्हणाले. मला विश्वास आहे की, जेव्हा निवडणुका जवळ आलेल्या असतात. तेव्हा पूर्ण बजेट ठेवले जात नाही. आम्हीही याच परंपेचे निर्वहन करत, पूर्ण बजेट नवे सरकार स्थापन झाल्यानंतर आपल्यासमोर घेऊन येऊ. उद्या देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारमण आपल्या सर्वांसमोर आपला अर्थसंकल्प सादर करतील, असेही मोदी म्हणाले.

टॅग्स :Budgetअर्थसंकल्प 2024Narendra Modiनरेंद्र मोदीBudget Sessionअर्थसंकल्पीय अधिवेशन