शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News: कोरोनाची तिसरी लाट कधी? दररोज किती रुग्ण सापडणार? IIT कानपूरच्या शास्त्रज्ञांनी दिलं उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2021 12:54 IST

CoronaVirus News: ओमायक्रॉननं चिंता वाढवली; देशात तिसरी लाट येण्याची शक्यता

मुंबई: नवी दिल्ली: देशातील ओमायक्रॉन बाधितांचा आकडा २३ वर पोहोचला आहे. गेल्या आठवड्यात गुरुवारी देशात ओमायक्रॉनचा पहिला रुग्ण आढळून आला. त्यानंतर चार दिवसांत हा आकडा २० च्या पुढे गेला आहे. राज्यात आतापर्यंत १० जणांना नव्या व्हेरिएंटची लागण झाली आहे. त्यामुळे चिंता वाढली आहे. ओमायक्रॉन अधिक संक्रामक आहे. त्याचा फैलाव अतिशय वेगानं होतो. ओमायक्रॉनमुळे देशात तिसरी लाट येणार का, असा प्रश्न अनेकांना पडला आहे.

कोरोनाची तिसरी लाट फेब्रुवारीत टोक गाठेल. त्यावेळी देशात एक ते दीड लाख रुग्ण आढळून येतील, असा अंदाज आयआयटी कानपूरच्या शास्त्रज्ञांनी व्यक्त केला आहे. ओमायक्रॉन व्हेरिएंटमुळे कोरोनाची तिसरी लाट येईल. फेब्रुवारीत तिसरी लाट येऊ शकेल. तिची तीव्रता दुसऱ्या लाटेच्या तुलनेत कमी असेल. ओमायक्रॉनची लागण झाल्यावर होणारे परिणाम डेल्टाइतके गंभीर नसल्याचं आतापर्यंत दिसून आलं आहे, असं असं आयआयटीचे शास्त्रज्ञ मनिंद्र अग्रवाल यांनी सांगितलं.

देशात लॉकडाऊन लागणार?दक्षिण आफ्रिकेत कोरोनाचा नवा व्हेरिएंट आढळून आला. तिथे आढळून येणाऱ्या रुग्णसंख्येवर आम्ही लक्ष ठेवून आहोत. अद्याप तरी दक्षिण आफ्रिकेत ओमायक्रॉनमुळे रुग्णालयात दाखल होणाऱ्यांचं प्रमाण वाढलेलं नाही. नवा व्हेरिएंट जास्त संक्रामक आहे. मात्र त्याचा परिणाम गंभीर नाही. तो डेल्टाच्या तुलनेत अतिशय कमी आहे, असं अग्रवाल म्हणाले. रात्री संचारबंदी लागू केल्यास, गर्दीवर निर्बंध आणल्यास कोरोनाचा फैलाव कमी होऊ शकतो, असंही त्यांनी सांगितलं.

सध्या देशात ओमायक्रॉनचे किती रुग्ण?आतापर्यंत देशात ओमायक्रॉनचे २३ रुग्ण आढळून आले आहेत. पैकी १० रुग्ण महाराष्ट्रातील आहेत. राजस्थानमध्ये ९ रुग्णांची नोंद झाली आहे. कर्नाटकमध्ये २, तर दिल्ली आणि गुजरातमध्ये प्रत्येकी १ रुग्ण आढळून आला आहे. २ डिसेंबरला देशात पहिल्या कोरोना रुग्णाची नोंद झाली. बंगळुरूमध्ये हा रुग्ण आढळून आला. रविवारी पुणे जिल्ह्यात ओमायक्रॉनचे ७ रुग्ण सापडले. यापैकी ६ जण एकाच कुटुंबातील आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याOmicron Variantओमायक्रॉन