नवी दिल्ली : मोदी सरकारने विरोधकांच्या विरोधाला न जुमानता तिसऱ्यांदा वादग्रस्त भूसंपादन वटहुकूम जारी केला आहे. रविवारी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी वटहुकमाला मंजुरी दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत वटहुकूम पुन्हा जारी करण्याचा निर्णय झाला होता.ज्यांच्या जमिनी ताब्यात घेण्यात आल्या अशांना नुकसानभरपाई देण्याबाबत कायदेशीर चौकट तयार करण्यासाठी हे विधेयक कायम ठेवण्याची गरज पाहता वटहुकूम जारी करणे अपरिहार्य होते. हा वटहुकूम संसदेच्या दोन्ही सभागृहांसमोर ठेवला जाणार आहे.
भूसंपादन वटहुकूम तिसऱ्यांदा जारी
By admin | Updated: June 1, 2015 02:04 IST