विचारकुंभ
By admin | Updated: August 31, 2015 00:24 IST
जीवनात सुख-दु:ख येतच असतात
विचारकुंभ
जीवनात सुख-दु:ख येतच असतातनाशिक : मानसाच्या जीवनात सुख-दु:ख येतच असतात, ती एक विश्वकर्त्याची व्यवस्था आहे. त्याला परमात्म्याची माया समजून जीवन जगल्यास दु:खाची तीव्रता कमी वाटेल आणि सुखाचा आनंद घेताना आपल्याला परमेश्वराची जाणीव राहील, असे विचार मथुरा येथील अतुलकृष्ण भरद्वाज यांनी मांडले. रामदास सेवा संस्थानच्या वैदेही भवनात महामंडलेश्वर महंत रामशरण महाराज यांच्या खालसात कथाण्यास प्रवचन प्रसंगी भरद्वाज महाराज बोलत होते. यावेळी त्यांनी सांगितले. परमेश्वरावर विश्वास टाकून जीवनातील संकटांना सामोरे जावे. भक्ती, ज्ञान व वैराग्य या तीन गोष्टीचे महत्त्व आहे. परंतु आपण कोणत्या गोष्टींना महत्त्व देतो हे आपल्या लक्षात यायला हवे. सूर्य आणि चंद्र यांनादेखील ग्रहण लागते. भक्ती केली, तर भगवंताचे दर्शन होते. ज्ञानाने समाधान मिळते आणि वैराग्य प्राप्तीने जीवनातील खरे सुख मिळते, असेही महाराज म्हणाले.