शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

हे आहेत भारतातील टॉप स्मार्टफोन ब्रँड !

By admin | Updated: February 14, 2017 17:53 IST

सध्या सर्वत्र डिजीटल होत असल्यामुळे मोबाईल कंपन्यामध्येही रस्सीखेच सुरु असल्याचे दिसून येत आहे. भारतीय मोबाईल मार्केटमध्ये मोठ्याप्रमाणात स्मार्टफोनची विक्री होत आहे.

ऑनलाइन लोकमत
 
मुंबई, दि. 14 - सध्या सर्वत्र डिजीटल होत असल्यामुळे मोबाईल कंपन्यामध्येही रस्सीखेच सुरु असल्याचे दिसून येत आहे. भारतीय मोबाईल मार्केटमध्ये मोठ्याप्रमाणात स्मार्टफोनची विक्री होत आहे.
 
अनेक कंपन्यांनी ग्राहकांच्या पसंतीला उतरतील असे स्मार्टफोन मार्केटमध्ये आणले आहेत. सध्या भारतीय मोबाईल मार्केटमध्ये सॅमसंग, शिओमी, लेनोवो, ओपो आणि विवो या कंपन्याच्या स्मार्टफोनची आवक वाढली आहे.  
 
 
सॅमसंग - भारतीय मोबाईल मार्केटमध्ये सध्या सॅमसंग कंपनीच्या स्मार्टफोनची चलती आहे. तिमाहीत 25.1 टक्के सॅमसंगच्या स्मार्टफोनची विक्री झाल्याचे दिसून आले आहे.  मात्र, साऊथ कोरियनच्या या कंपनीला जागतिक मोबाईल मार्केटमध्ये म्हणावे, तसे यश मिळाले नाही. जागतिक मार्केटमध्ये टॉपला आयफोन आहे. 
 
शिओमी - चीनमधील शिओमी कंपनीने स्मार्टफोन भारतातील मोबाईल मार्केटमध्ये दुस-या स्थानावर आहेत. गेल्या काही महिन्यापासून शिओमीच्या स्मार्टफोनची आवक भारतात मोठ्याप्रमाणात झाल्याचे दिसून आले. सध्या भारतातील मार्केटमध्ये तिमाहीत 10.7 टक्के इतकी विक्री झाली आहे. 
 
लेनोवो - भारतीय मोबाईल मार्केटमधील गेल्या तिमाहीमध्ये लेनोवोच्या स्मार्टफोनची चलती होती. मात्र, आत्ताच्या तिमाहीत घसरली आणि दुस-या स्थानावरुन तिस-या स्थानवर येऊन पोहचली. या स्मार्टफोनची तिमाहीत 9.9 टक्के विक्री झाली आहे. 
 
ओपो -  ओपो स्मार्टफोन कंपनी ही चीनची असून भारतीय मार्केटमध्ये चौथ्या स्थानावर आहे. मार्केटमधील तिमाहीत 8.6 टक्के इतक्या स्मार्टफोनची विक्री झाली आहे. याचबरोबर जागतिक मार्केटमध्ये सुद्धा ओपोच्या स्मार्टफोनची आवक वाढली आहे.  
 
विवो - भारतीय मोबाईल मार्केटमध्ये पाचव्या स्थानावर विवो स्मार्टफोन आहे. विवो चीनस्थित कंपनी असून भारतात मोठ्याप्रमाणात स्मार्टफोनची विक्री करण्यास सुरुवात केली आहे. तसेच, गेल्या काही दिवसापूर्वी या कंपनीने भारतात स्मार्टफोनची निर्मिती करण्याचे घोषित केले आहे. ऑनलाइनच्या माध्यमातून स्मार्टफोन विक्री करण्यावर भर देण्यात येत आहे. सध्याच्या तिमाहीत 7.6 टक्के इतकी या स्मार्टफोनची विक्री झाली आहे.