शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपतिपदावर कोण बसणार? एनडीए खासदारांनी घेतले प्रशिक्षण, तर इंडिया आघाडीचे आज मॉक पोल
2
Ganesh Visarjan 2025: राज्यात गणेश विसर्जनावेळी ९ जणांचा बुडून मृत्यू; १२ जण बेपत्ता
3
ट्रम्प यांच्या टॅरिफ'वर तोडगा काढण्यासाठी भारत अन् युरोपियन युनियन एकत्र! 'एफटीए'सह अनेक मुद्द्यांवर विशेष प्लान बनवला
4
US Open 2025: अल्काराझचं राज्य! हार्ड कोर्टवर सिनरला मात देत अमेरिकन ओपन जेतेपदासह नंबर वनवर कब्जा
5
भरती-ओहोटीत रेंगाळला लालबागचा राजा, ३६ तासांनी विसर्जन; राजाला निरोप देण्यासाठी भाविकांचे प्राण कंठाशी
6
Crime: कचऱ्याच्या ढिगाऱ्यात आढळला अज्ञात महिलेचा अर्धवट जळालेला मृतदेह, परिसरात खळबळ!
7
जीएसटी कपातीने २ लाख कोटींचा सरकारला तोटा? श्रीमंत-गरीब दरी वाढल्याचा फटका बसणार
8
अग्रलेख: माफियांपुढे ‘दादा’गिरी शरण, योग्य तो बोध घ्यावा
9
दिवाळीत मध्य रेल्वेच्या ९४४ एक्स्प्रेस गाड्या धावणार; प्रवाशांच्या सुविधांसाठी अनारक्षित व्यवस्था
10
किम जोंग-पुतीन भेटीत ग्लास, ठशांचं रहस्य! ‘सीक्रेट’ कायम सीक्रेटच राहू द्यावं
11
अदानी लिमिटेडविरुद्धचा ‘तो’ मानहानिकारक मजकूर नष्ट करा; उच्च न्यायालयाचे निर्देश, प्रकरण काय? 
12
एक वर्ष पूर्ण होण्याआधीच जपानचे पंतप्रधान शिगेरू इशिबा पायउतार
13
विशेष लेख: राम आणि कृष्णकथेच्या हृदयातले अमृत!
14
भारताने रशियाकडून केली तेल खरेदी, अन् नवारो-मस्क यांच्यात भडका! काय म्हणाले होते नवारो?
15
चिंताजनक! कोणतेही प्रशिक्षण नसलेल्यांकडून भारतात २.५ टक्के महिलांची होतेय प्रसूती, महाराष्ट्रात स्थिती काय?
16
पीडित मुलगी ठाम तर नराधमास शिक्षा होणारच; १० वर्षांच्या मुलीवर बलात्कार, आरोपीला १२ वर्षांचा कारावास 
17
रामायण केवळ कथा नाही तर धर्म, जीवन जगण्याची कला : मोरारीबापू
18
गणपती विसर्जन सोहळ्यावर शोककळा; वेगवेगळ्या घटनांमध्ये 5 जणांचा मृत्यू  
19
Chandra Grahan: कोल्हापूरच्या खगोलप्रेमींनी अनुभवली ब्लड मूनची अद्भुत दृश्यं, एकदा पहाच...
20
टोयोटाकडून मोठी घोषणा! फॉर्च्युनरची ३.४९ लाखांनी किंमत तुटली, क्रिस्टा तर मार्केट खाणार...

...गंभीर परिणाम होतील; मित्रराष्ट्र रशियानेच भारताला दिली धमकी, काय आहे प्रकरण?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2023 15:01 IST

FATF ने फेब्रुवारी २०२३ ला रशियाची सदस्यता रद्द केली आहे.

नवी दिल्ली - यूक्रेन युद्धामुळे जगात टीकेचा धनी बनलेला रशिया आता भारतावर एफएटीएफला सहकार्यसाठी दबाव बनवत आहे. जर भारतानेरशियाला FATF च्या ब्लॅक लिस्ट अथवा ग्रे लिस्टमध्ये समावेश करण्यापासून वाचवले नाही तर तो भारतासोबत संरक्षण आणि ऊर्जा करार संपुष्टात आणेल असा इशारा दिला आहे. ब्लूमबर्ग रिपोर्टने हा दावा केला आहे. 

FATF (फायनान्शियल एक्शन टास्क फोर्स) ही एक आंतरराष्ट्रीय संस्था आहे जी आंतरराष्ट्रीय आर्थिक गुन्हे रोखण्याचा प्रयत्न करते. FATF च्या काळ्या किंवा ग्रे लिस्टमध्ये समाविष्ट असलेल्या देशावर देखरेख वाढवली जाते आणि त्यांना देण्यात येणारी आर्थिक मदत बंद केली जाते. ब्लूमबर्ग या वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार पडद्यामागे रशिया भारतासह ग्लोबल साउथच्या अनेक देशांना FATF यादीतून वाचवण्यासाठी दबाव आणत आहे. फायनान्शिअल एक्शन टास्क फोर्सने युक्रेनसोबतच्या युद्धामुळे जूनमध्ये रशियाचा काळ्या यादीत समावेश करण्याची शक्यता आहे. रशिया स्वत:ला आर्थिकदृष्ट्या वाचवण्यासाठी भारतासोबतचा संरक्षण आणि ऊर्जा करार रद्द करण्याची धमकी देत आहे. 

FATF ने फेब्रुवारी २०२३ ला रशियाची सदस्यता रद्द केली आहे. एफएटीएफने सांगितले की, यूक्रेनसोबत रशियाचे जे युद्ध सुरू आहे ते FATF च्या मूलभूत सिद्धांताविरोधात आहे. रशियाची कारवाई यूक्रेनला उकसवण्याची आहे. त्यामुळे सदस्यता रद्द केल्यानंतर आता FATF रशियाला ब्लॅक अथवा ग्रे यादीत समावेश करण्याची शक्यता आहे. 

रशियाचा इशारारिपोर्टनुसार, या महिन्याच्या सुरुवातीला एका रशिया स्टेट एजेन्सीने भारताला इशारा दिला की, एफएटीएफने रशियाला ब्लॅक अथवा ग्रे लिस्टमध्ये टाकलं तर ऊर्जा, संरक्षण आणि ट्रान्सपोर्टेशन क्षेत्रावर त्याचे गंभीर परिणाम होतील. हा अत्यंत गंभीर आणि संवेदनशील मुद्दा आहे. रशियाने या प्रस्तावाला भारताने विरोध करावा असा आग्रह धरला आहे. रशियाचा या यादीत समावेश झाला तर भारतालाही अडचणींचा सामना करावा लागेल. अद्याप या प्रकरणी कुठल्याही देशाने अधिकृत विधान केले नाही. 

भारतावर काय होईल परिणाम?यूक्रेन युद्धामुळे अमेरिकेसह पाश्चात्य देशांनी रशियावर प्रतिबंध लावले आहेत. त्यामुळे रशियाला अर्थव्यवस्था स्थिर ठेवण्यासाठी चीन, भारत, तैवानसारख्या देशांशी संबंध चांगले ठेवण्याची आवश्यकता आहे. जर रशियाला एफएटीएफने ब्लॅक लिस्ट केले तर या देशांशी रशियाला व्यापार करणे कठीण होईल आणि त्याचा फटका अर्थव्यवस्थेवर होईल. तेल कंपनी रोजनेफ्ट आणि नायरा एनर्जी लि. यांच्यातील द्विपक्षीय करारावर परिणाम होईल. रशियन शस्त्रे, सैन्य उपकरणे निर्यातीसह संरक्षण खात्यातील तंत्रज्ञान सहकार्यावर परिणाम होऊ शकतो. 

टॅग्स :russiaरशियाIndiaभारतRussia Ukrainयुक्रेन आणि रशिया