शहरं
Join us  
Trending Stories
1
Aishanya Dwivedi : Video - "BCCI पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर विसरलं; आपण पाकिस्तानला ही संधी का देतोय?"
2
या सुंदर प्रदेशावर हिंसाचाराची सावली पडलेली; पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूरमध्ये, म्हणाले...
3
"आदित्य ठाकरे बुरख्यात लपून भारत-पाकिस्तान मॅच पाहतील"; मंत्री नितेश राणेंची बोचरी टीका
4
'या' देशाने मंत्रिमंडळात आणला AI मंत्री ! राजकारणाच्या इतिहासात पहिल्यांदाच असा प्रयोग
5
"देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल
6
वर्गमित्रांचा प्रताप! झोपेत असताना डोळ्यात टाकलं फेविक्विक; ८ विद्यार्थ्यांचे चिकटले डोळे अन्...
7
पत्नीला ५ गोळ्या घातल्या, क्राइम सीनवरून फेसबुक लाईव्ह केलं; पती म्हणाला, "हिचे बॉयफ्रेंड पळून गेले..." 
8
शुबमन गिलच्या फोटोपेक्षा हातातल्या घड्याळ्याची रंगली चर्चा, किंमत ऐकाल तर अवाक् व्हाल...
9
क्रूरतेचा कळस! मिठाई ताजी नाही हे ऐकताच दुकानदार संतापला; १० वर्षांच्या मुलाला बेदम मारहाण
10
पितृपक्ष २०२५: पितृपक्षात जन्मलेल्या बाळांचे भविष्य कसे असते? शुभ की? ज्योतिष शास्त्राने केला उलगडा!
11
४०००० कोटींचे उत्पन्न, ७० लाख नोकऱ्या; नितीन गडकरींनी दिला कमाईचा नवा मंत्र, कुणाला फायदा?
12
उमेश सहकलाकार नसता तर मी हा सिनेमा केला नसता, प्रिया बापटने सांगितलं कारण
13
२, ३, ४BHK घर बांधायचेय? जीएसटीचा किती फायदा होणार? सिमेंट, सळ्या, टाईल्स कितीने स्वस्त झाल्या
14
गर्लफ्रेंडने ब्लॉक केलं, प्रेमभंग जीवावर बेतला, तरुणाने उचलले टोकाचे पाऊल; उपचारादरम्यान मृत्यू
15
१०% नं घसरलाय हा शेअर, पण अजूनही IPO च्या किंमतीपेक्षा ६०% नं अधिक; काय म्हणाले एक्सपर्ट?
16
सचिन तेंडुलकरच्या विमानाची इमर्जन्सी लँडिंग, केनियामध्ये जंगल भागात अडकला...
17
एक काळ होता..., स्मार्टफोन पाण्यासारखे विकले जात होते...; शाओमीचा सेल कमालीचा घसरला
18
ऑपरेशन मध्यातच सोडून पाकिस्तानी डॉक्टर झाला गायब! नर्सने दुसऱ्या रूमचा दरवाजा उघडताच दिसला धक्कादायक प्रकार
19
अंकिता लोखंडेचा नवरा रुग्णालयात दाखल; हाताला ४५ टाके अन्... मित्राने शेअर केली पोस्ट
20
प्रेम कहाणीचा दुर्दैवी अंत! ६ महिन्यापूर्वी प्रियकरासोबत लग्न केलेल्या युवतीने उचललं टोकाचं पाऊल

'या' चार राज्यांमध्ये मोठा उलटफेर होणार; भाजप जोरदार मुसंडी मारण्याची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2024 07:25 IST

अनेक राज्यांत एनडीएला स्पष्ट बहुमत मिळत आहे, तर काही राज्यांत एनडीएला अपेक्षित यश मिळत नसल्याचेही दिसत आहे.

नवी दिल्ली : सातव्या टप्प्यातील मतदान झाल्यानंतर जाहीर झालेल्या एक्झिट पोल्समध्ये एनडीएला ३६१-४०१, तर इंडियाला १३१ ते १६६ जागा मिळण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. अनेक राज्यांत एनडीएला स्पष्ट बहुमत मिळत आहे, तर काही राज्यांत एनडीएला अपेक्षित यश मिळत नसल्याचेही दिसत आहे; परंतु आंध्र प्रदेश, ओडिशा, तेलंगणा, पश्चिम बंगालमध्ये मोठा उलटफेर होताना दिसत आहे. 

वायएसआरचे पानिपतएकूण २५ जागा असलेल्या आंध्र प्रदेशमध्ये सत्ताधारी वायएसआर काँग्रेसला मोठा धक्का बसत आहे.  टीडीपी, भाजप व जनसेना यांच्या एनडीएला २१ जागा मिळत आहेत.वायएसआरला  २ ते ४ जागा मिळत असून, इंडिया आघाडी भोपळाही फोडू शकणार नाही.

बीजेडीला मोठा धक्का ओडिशात सत्ताधारी बीजेडीला धूळ चारत यंदा भाजप सर्वांत मोठा पक्ष म्हणून पुढे येताना दिसत आहे. भाजपला तब्बल १८-२० जागा मिळण्याचा अंदाज आहे. बीजेडी केवळ २ जागा जिंकेल. २०१९ मध्ये बीजेडीला १२ जागा मिळाल्या होत्या, तर भाजपला ८ जागा मिळाल्या होत्या.

काँग्रेसचा दणकासत्तेत असलेल्या काँग्रेसला मोठा फटका बसत आहे. काँग्रेस व बीआरएसचा गड भेदत भाजपला ११ ते १२ जागा मिळताहेत. २०१९ मध्ये ९ जागा जिंकणाऱ्या बीआरएसला १ जागा मिळत आहे.  ओवैसींचा एमआयएमही एखाद्या जागेपर्यंत मर्यादित राहू शकतो.

ममता बॅनर्जींना धक्कास्वतंत्र लढणाऱ्या तृणमूलला यंदा मोठा धक्का बसणार आहे. २०१९ मध्ये २२ जागा जिंकणारी तृणमूल ११ ते १४ जागांपर्यंत मर्यादित राहील. भाजप ४६ टक्के मतांसह ४२ पैकी २६ ते ३१ जागा मिळत आहेत, काँग्रेस व डाव्यांच्या आघाडीला केवळ ०-२ जागा मिळू शकते. 

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४exit pollमतदानोत्जतर जनमत चाचणीWest Bengal Lok Sabha Election 2024पश्चिम बंगाल लोकसभा निवडणूक निकाल २०२४telangana lok sabha election 2024तेलंगाना लोकसभा निवडणूक निकाल २०२४andhra pradesh lok sabha election 2024आंध्रप्रदेश लोकसभा निवडणूक निकाल २०२४