शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

भारतीय तरुणांच्या एच वन बी व्हिसामध्ये अडथळे येऊ नयेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2019 05:17 IST

एस. जयशंकर; अमेरिकेतील प्रतिनिधींना केले आवाहन

वॉशिंगटन : भारतातून रोजगारांसाठी येणाऱ्या हुशार व प्रतिभावान तरुणांना एच वन बी व्हिसा देण्यात अमेरिकेने अडथळे आणू नये, असे आवाहन भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयंशकर यांनी येथे केले.भारत आणि अमेरिका यांच्या आर्थिक सहकार्य असणे गरजेचे आहे, असे सांगून परराष्ट्रमंत्री म्हणाले की, सहकार्याचा पूल बांधणे गरजेचे आहे. माहिती व तंत्रज्ञान क्षेत्रातील भारतीय तरुणांचे अमेरिकेच्या विकासामध्येही योगदान आहे. त्यामुळे त्यांना नोकरीसाठीचा व्हिसा मिळण्यातील अडथळे दूर होणे आवश्यक आहे.या एच वन बी व्हिसाच्या आधारेच अमेरिकेतील कंपन्या बहुतांशी भारतीय तरुणांना तिथे रोजगार देऊ शकतात. त्यातून भारतीय तरुणांचा जसा फायदा होतो, तसेच या कंपन्यांनाही कौशल्य असलेले, तसेच प्रतिभावान लोक उपलब्ध होतात. त्यामुळे भारत व चीनमधून हजारो तरुण या नोकऱ्यांसाठी अमेरिकेत जात असतात. या पार्श्वभूमीवर परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी केलेले हे आवाहन अतिशय महत्त्वाचे आहे.गेल्या काही वर्षांत अमेरिकन लोकांनाच रोजगार मिळावा, अन्य देशांतील लोकांनी हे रोजगार बळकावले आहेत, असा प्रचार तिथे सुरू झाला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची अमेरिकन फर्स्ट ही भूमिकाही तशीच आहे. त्यामुळे एच वन बी व्हिसा मिळण्यात अडचणी येऊ लागल्या आहेत. दरवर्षी हजारो विद्यार्थी उच्च शिक्षणासाठी अमेरिकेत जातात आणि मग तिथेच नोकरी करतात, पण नोकरीसाठीचा व्हिसा मिळण्यात अडचणी येत असल्याने तिथे उच्च शिक्षणासाठी जाणाºया भारतीय विद्यार्थ्यांची संख्याही कमी झाली आहे. (वृत्तसंस्था)प्रमाण कमी करण्याचा विचाररोजगारासाठी अमेरिकेत येणाºया भारतीय तरुणांच्या व्हिसामध्ये अनावश्यक कायदेशीर अडचणी निर्माण केले जाऊ नयेत, अशी भूमिकाही परराष्ट्रमंत्र्यांनी तेथील विविध बैठकांमध्ये मांडली. भारतीयांच्या एच वन बी व्हिसांचे प्रमाण कमी करण्याचा विचार अमेरिकी प्रशासनाने चालविला आहे. त्याचा परिणाम आयटी क्षेत्रातील भारतीय तरुणांवर होण्याची दाट शक्यता आहे.