मुलींचा थांगपत्ता नाही
By admin | Updated: July 30, 2015 23:14 IST
श्रीरामपूर : मंगळवारी दुपारी गोदावरी नदीत वाहून गेलेल्या दोघा मुलींचा बुधवारी दुसर्या दिवशीही थांगपत्ता लागला नाही.
मुलींचा थांगपत्ता नाही
श्रीरामपूर : मंगळवारी दुपारी गोदावरी नदीत वाहून गेलेल्या दोघा मुलींचा बुधवारी दुसर्या दिवशीही थांगपत्ता लागला नाही.गोवर्धन (ता. श्रीरामपूर) येथे गोदावरी नदी काठावर आशा पोपट गोरे (वय १८ ) व राणी जगन्नाथ मोरे (वय ९) या दोघी कपडे धुण्यासाठी गेल्या होत्या. त्यानंतर त्या आंघोळीसाठी नदीपात्रात उतरल्यानंतर पाण्यात वाहून गेल्या. प्रांताधिकारी प्रकाश थविल, तहसीलदार किशोर कदम, तालुका पोलीस ठाण्याचे सहायक निरीक्षक डॉ. शरद गोर्डे यांनी घटनास्थळी धाव घेऊन स्थानिक गावकर्यांच्या मदतीने विविध प्रकारे या मुलींचा शोध घेण्याचा प्रयत्न केला.दारणा धरणातून मंगळवारच्या तुलनेत बुधवारी ३० हजार क्युसेक अशा जादा वेगाने पाणी सोडण्यात आले आहे. पाण्याच्या वाढत्या प्रवाहामुळे शोधकार्यात अडथळे येत आहेत. बुधवारी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास चांदेगाव परिसरात दोन मृतदेह सापडल्याची अफवा होती. त्याची महसूल विभागाने शहानिशा केली असता नदीपात्रात रंगीत कपडे वाहत असल्याने मृतदेह सापडल्याचे अफवा पसरल्याचे स्पष्ट झाले. या जलसमाधी मिळालेल्या मुलींचा रात्री ८ वाजेपर्यंत थांगपत्ता लागला नसल्याचे तहसीलदार किशोर कदम यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)