शहरं
Join us  
Trending Stories
1
वाटाघाटी फिसकटल्या, आता पुन्हा युद्ध... ट्रम्प यांच्या आदेशाने इराणवर परत सुरु होणार हल्ले?
2
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
3
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
4
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
5
पश्चिम बंगालमधील मतदारयाद्यांबाबत सुप्रीम कोर्टात आज निकाल
6
विदर्भात पारा ५ अंशांनी वाढला; अकोला जिल्हा सर्वाधिक ‘हॉट’, थंड हवेचे ठिकाण बुलढाणाही तापले; ८ दिवस राहणार तडाखा
7
MI vs RCB : विकेट गमावल्यावर Virat Kohli ला राग अनावर! हेल्मेट-ग्लोव्हज फेकल्याचा व्हिडिओ व्हायरल
8
विशेष लेख: पाकिस्तानच्या भूमिकेवरून एवढा गोंधळ, गदारोळ का?
9
‘पीएच.डी गाइड’च्या छळाला कंटाळून पुण्यात विद्यार्थिनीनं संपवलं जीवन, मार्गदर्शक शास्त्रज्ञ अटकेत; चिठ्ठीतून गंभीर आरोप
10
चीनने पाकव्याप्त काश्मीर-अफगाण सीमेजवळ स्थापन केला नवीन विभाग
11
‘ईशान्येला देशापासून वेगळे करण्याचा डाव’, पंतप्रधान मोदींचा गंभीर आरोप
12
अमरनाथ यात्रा ३ जुलैला सुरू होणार; १५ एप्रिलपासून नोंदणी
13
Iran War: इराणच्या युद्धात महासत्ता अमेरिकेचा ‘सेल्फ गोल’
14
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
15
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
16
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
17
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
18
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
19
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
20
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थी आहेत म्हणून कायदा-सुव्यवस्था हातात घेऊ शकत नाहीत- शरद बोबडे

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2019 12:54 IST

नागरिकत्व सुधारणा विधेयकावरून ईशान्येकडील राज्ये पेटलेली आहेत.

नवी दिल्लीः नागरिकत्व सुधारणा विधेयकावरून ईशान्येकडील राज्ये पेटलेली आहेत. त्याचं लोण आता दिल्लीपर्यंत येऊन पोहोचलं आहे. नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात दिल्लीतल्या जामिया मिलिया विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी कॅम्पसमध्ये आंदोलन केलं. त्या आंदोलनाला हिंसक वळण लागल्यानंतर आता ते प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेलं आहे. या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात एक याचिका दाखल करण्यात आली असून, मंगळवारी याचिकेवर सुनावणी होणार आहे. सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश एस. ए. बोबडेंनी या हिंसाचाराचा निषेध नोंदवला आहे. सरन्यायाधीश एस. एस बोबडे म्हणाले, विद्यार्थी आहेत म्हणून हिंसक आंदोलनाचा त्यांना अधिकार नाही. विद्यार्थी असल्यानं ते कायदा-सुव्यवस्था हातात घेऊ शकत नाहीत. प्रकरण शांत झाल्यानंतर यावर निर्णय घेण्यात येईल. यासंदर्भात आता काहीही टिपण्णी करण्याची योग्य वेळ नाही. हिंसाचार थांबल्यानंतर यावर चर्चा केली जाईल. तसेच ही हिंसा तात्काळ थांबली पाहिजे. दिल्ली पोलिसांनी कायदा-सुव्यवस्था मजबूत केली पाहिजे, असा सल्लाही त्यांनी दिल्ली पोलिसांना दिला आहे. दुसरीकडे जामिया मिलिया विद्यार्थ्यांच्या व शिक्षकांच्या संघटनांनी या हिंसाचाराशी विद्यार्थ्यांचा काही संबंध नसल्याचं सांगितलं आहे. कॅम्पसबाहेरचे हे आंदोलन व हिंसाचार स्थानिक लोकांनी केले असून, विद्यापीठाला बदनाम करण्यासाठी त्याचे खापर आमच्यावर फोडले जात असल्याचा आरोप विद्यार्थी संघटनेने केला. या आंदोलन व हिंसाचारामुळे दिल्ली मेट्रोची जामिया, सुखदेव विहार, जसोला, शाहीन बाग व आश्रम रोडसह तेरा स्थानके काल संध्याकाळनंतर बंद करण्यात आली व गाड्यांचे तेथील थांबेही रद्द करण्यात आले. अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी झाली.या आंदोलनापायी विद्यापीठाने सर्व परीक्षा रद्द करून 5 जानेवारीपर्यंत सुट्टी जाहीर केली. या आंदोलनाचा रविवारी सहावा दिवस होता. शेकडो विद्यार्थी, तरुण, विविध राजकीय पक्षांचे नेते, संघटनांचे प्रतिनिधी रविवारी जामियाजवळ जमले होते. सायंकाळी चार वाजता हजारोंच्या संख्येने आंदोलक जमले. त्यांच्यासमोर एका राजकीय नेत्याचे भाषण झाले. जमावाचा त्यामुळेच भडका उडाला व बसेसची जाळपोळ सुरू झाली.

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयcitizen amendment billनागरिकत्व सुधारणा विधेयक