शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

"केरळच्या पुराला राष्ट्रीय आपत्ती घोषित करण्याची कायद्यात तरतूद नाही''

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2018 09:35 IST

केरळमध्ये गेल्या 13 दिवसांपासून पावसानं हाहाकार माजवलाय. या पावसानं आलेल्या पुरात केरळचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे.

नवी दिल्ली- केरळमध्ये गेल्या 13 दिवसांपासून पावसानं हाहाकार माजवलाय. या पावसानं आलेल्या पुरात केरळचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. त्याच पार्श्वभूमीवर केरळच्या पुराला राष्ट्रीय आपत्ती घोषित करण्याची मागणी विरोधकांनी केली आहे. राष्ट्रीय आपत्ती घोषित करण्यावरून काँग्रेस आणि मोदी सरकारमध्ये आरोप-प्रत्यारोपही झाले आहेत. परंतु केरळच्या पुराला राष्ट्रीय आपत्ती घोषित करण्याची कायद्यात कोणतीही तरतूद नाही. त्यामुळे केरळच्या पुराला राष्ट्रीय आपत्ती घोषित करू शकत नसल्याचं स्पष्टीकरण केंद्रीय मंत्री अल्फोन्स कन्ननथानम यांनी दिलं आहे. तसेच काँग्रेसच्या नेत्यांनी राष्ट्रीय आपत्ती जाहीर करण्याची केलेली मागणीही फेटाळून लावली आहे.आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005मध्ये अशी कोणत्याही प्रकारची तरतूद नाही. काँग्रेस नेते ए. के. अँटोनी यांच्या विधानाचा समाचार घेत केंद्रीय मंत्री म्हणाले, आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 हा कायदा काँग्रेसचं सरकार संसदेत असताना मंजूर करण्यात आला आहे. त्यात पुराला राष्ट्रीय आपत्ती जाहीर करण्याची कोणतीही तरतूद नाही. काँग्रेस जेव्हा 2004 ते 2014पर्यंत सत्तेत होती, त्यावेळी त्यांनी कोणत्याही संकटांना राष्ट्रीय आपत्ती घोषित केलं नाही. तर दुसरीकडे आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडूंनीही केंद्राकडे केरळमधील पुराला राष्ट्रीय आपत्ती जाहीर करण्याची मागणी केली आहे. काय आहे आपत्ती ?2005च्या आपत्ती कायद्यानुसार, कोणत्याही भागात नैसर्गिक किंवा मानवरहित कारणांनी संकट ओढवलं आणि त्याच्याशी लढा देणं शक्य नसल्यास आपत्ती जाहीर करण्यात येते. भूकंप, पूर, भूस्खलन, त्सुनामीला नैसर्गिक आपत्ती घोषित केली जाते. तर न्यूक्लिअर, बॉयोलॉजिकल, केमिकल संकटांना मानवनिर्मित संकटं समजली जातात. 

टॅग्स :KeralaकेरळKerala Floodsकेरळ पूर