शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
3
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
4
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
5
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
6
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
7
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
8
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
9
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
10
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
11
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
12
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
13
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
14
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
15
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
16
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
17
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
18
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
19
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
20
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
Daily Top 2Weekly Top 5

दाऊद, हाफीजच्या प्रत्यार्पणाचा एकही प्रस्ताव नाही

By admin | Updated: May 15, 2017 00:17 IST

मुंबईत १९९३ मध्ये झालेल्या बॉम्बस्फोटातील आरोपी दाऊद इब्राहिम किंवा मुंबई हल्ल्यातील मास्टरमाइंड हाफीज सईद यांना प्रत्यार्पण करून भारतात आणण्यासाठी कोणत्याही

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : मुंबईत १९९३ मध्ये झालेल्या बॉम्बस्फोटातील आरोपी दाऊद इब्राहिम किंवा मुंबई हल्ल्यातील मास्टरमाइंड हाफीज सईद यांना प्रत्यार्पण करून भारतात आणण्यासाठी कोणत्याही तपासणी संस्थेकडून कोणताही प्रस्ताव आलेला नाही, अशी माहिती परराष्ट्र मंत्रालयाने माहितीच्या अधिकाराअंतर्गत (आरटीआय) दिली आहे. एका वृत्तसंस्थेने याबाबत माहिती विचारली होती. परराष्ट्र मंत्रालयाला विचारणा करण्यात आली होती की, हाफीज सईद आणि दाऊद इब्राहिम यांच्या प्रत्यार्पणाबाबत आणि त्यांना भारतात आणण्याबाबत काय कार्यवाही करण्यात आली आहे. दाऊद इब्राहिमवर १९९३ च्या मुंबई बॉॅम्बस्फोटाचा आरोप आहे. १९९३ च्या स्फोटात २६० जण ठार झाले होते, तर ७०० हून अधिक जखमी झाले होते. या स्फोटानंतर दाऊद देश सोडून पळून गेला होता. तो सध्या पाकिस्तानमध्ये असल्याचे सांगितले जात आहे. लष्कर -ए- तोयबाचा म्होरक्या असलेल्या हाफीज सईदवर २००८ च्या मुंबई हल्ल्याचा कट केल्याचा आरोप आहे.