शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
2
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
3
"सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
4
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
5
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
6
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
7
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?
8
Mumbai: संपत्तीसाठी मुलाची वृद्ध आईला मारहाण!
9
या छोट्याशा देशाने घेतली भारतीयांची जबाबदारी! इराणमधील ११० विद्यार्थी सीमेवर पोहोचले...
10
Plane Crash: तांत्रिक बिघाड नाही, यावेळी कारण वेगळंच... अहमदाबाद-लंडन विमान उड्डाण रद्द; एअर इंडियाने दिलं स्पष्टीकरण
11
परेश रावल यांच्यासोबतच्या वादावर अक्षय कुमारची प्रतिक्रिया, म्हणाला, "मला खात्री आहे की..."
12
Mumbai: भर पावसात रेनकोटसह कुणी रडत तर कुणी हसत पोहोचले शाळेत!
13
नाशिकमध्ये भाजपाचं 'बळ' वाढलं! सुधाकर बडगुजरांचा पक्षप्रवेश, महापालिका निवडणुआधी बेरजेचं राजकारण
14
इस्रायलने इराणवर केलेल्या हवाई हल्ल्यात किती लोकांचा मृत्यू झाला? दूतावासाने जारी केली धक्कादायक आकडेवारी
15
रिक्षा, दुचाकी कचऱ्यासारख्या वाहून गेल्या; गुजरातमध्ये तुफान पाऊस, व्हिडीओ व्हायरल
16
Rohit Sharma: तुमची भांडणं होतात का? हरभजनच्या प्रश्नावर रोहित शर्मा पत्नी रितिकासमोरच म्हणाला...
17
चार दिवस कसोटीचे! रुपडं बदलणार; पण टीम इंडियासह हे २ संघ जुनी परंपरा जपणार?
18
Ashadhi Ekadashi 2025: यंदा आषाढी एकादशी आणि चतुर्मासाची सुरुवात कधी ते जाणून घ्या!
19
Mumbai: मुंबईतील दोन आंतरराष्ट्रीय शाळांना बॉम्बची धमकी, तपासात असं समजलं की...
20
इस्त्रायलविरोधात युद्धात उतरणार 'इस्लामिक सैन्य'?; तुर्की, पाकिस्तान, सौदीला इराणचा प्रस्ताव

कृषी उत्पन्नावर कर लावण्याची कोणतीही योजना नाही- अरुण जेटली

By admin | Updated: April 26, 2017 14:36 IST

केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटलींनी कृषी उत्पन्नावर कर लावण्याची कोणतीही योजना नसल्याचं स्पष्टीकरण दिलं आहे.

ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. 26 - केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटलींनी कृषी उत्पन्नावर कर लावण्याची कोणतीही योजना नसल्याचं स्पष्टीकरण दिलं आहे. काही वेळापूर्वीच नीती आयोगाचे सदस्य बिबेक देबरॉय यांनी शेती उत्पन्नावर कर लावणार असल्याचं वक्तव्य केलं होतं. त्यावर खुलासा करत शेती उत्पन्नावर कर लावण्याची केंद्र सरकारची कोणतीही योजना नसल्याचं अरुण जेटलींनी स्पष्ट केलं आहे.ते म्हणाले, केंद्र सरकारची शेतक-यांच्या उत्पन्नावर कोणत्याही प्रकारचा कर लावण्याची योजना नाही. अशा कोणत्याही योजनेचा विचारही केला जाऊ शकत नाही. संविधानानुसार केंद्र सरकारला कृषी उत्पन्नावर कर लावण्याचा कोणताही अधिकार नाही. त्यामुळे शेतक-यांच्या उत्पन्नावर कोणीही कर लावू शकत नाही. काही तासांपूर्वीच नीती आयोगाचे सदस्य बिबेक देबरॉय हे एका मर्यादेनंतर कृषी उत्पन्नावर कर लावण्याचा प्रस्ताव केंद्राच्या विचाराधीन असल्याचं म्हणाले होते. असं केल्यास कराची मर्यादा वाढेल आणि राज्यांमधील कराच्या उत्पन्नाचं आणखी एक स्रोत निर्माण होईल. तसेच वैयक्तिक प्राप्तिकर भरण्यासाठी मिळणारी सवलतही बंद केली पाहिजे. त्याप्रमाणेच ग्रामीण क्षेत्रावरही कर लावला पाहिजे. त्यामुळे जास्तीत जास्त निधी सरकारच्या तिजोरीत जमा होईल, असा कयास बिबेक देबरॉय यांनी लावला होता. कृषी उत्पन्नावर तीन वर्षे, पाच वर्षे अशा सरासरीनं कर लावावा. जेणेकरून करातून मिळालेला निधी सरकारला इतरत्र वापरता येईल. कृषी उत्पन्नात दरवर्षी चढ-उतार येत असतात. नीती आयोगाचे सदस्य बिबेक देबरॉय यांच्या प्रस्तावाचं केंद्रीय अर्थमंत्र्यांनी खंडन केलं आहे.