शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
2
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
3
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
4
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
5
धावत्या लोकलमध्ये सशस्त्र हल्ल्यात प्रवाशाचा मृत्यू; कल्याण रेल्वे पोलिसांनी दोघांना केली अटक
6
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
7
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
8
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
9
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
10
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
11
मनसेच्या अविनाश जाधवांवर गुन्हा दाखल; पाच कोटींच्या वसुलीसाठी सोन्याच्या दागिन्यांचे व्यापारी जैन यांना धमकावल्याचा आरोप
12
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
13
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला
14
जातिवाचक शिवीगाळ, नग्न करून मारहाण; तरुणाची आत्महत्या, कोपर्डी घटनेतील पीडितेच्या भावासह तिघांविरुद्ध गुन्हा
15
रस्ता बांधल्यावरुन चीनला भारताने चांगलेच खडसावले; शक्सगाम खोरे हा आमचा भाग, केला दावा
16
सूर्यापेक्षा दीडपट दूरवरुन आला पृथ्वीवर सिग्नल; नासाच्या ‘सायके’ यानाची यशस्वी कामगिरी
17
भूषण पाटील दहा कोटींचे धनी; मालमत्तेत साडेसहा कोटींची वाढ
18
श्रीकांत शिंदेंकडे ७.५ कोटींची संपत्ती; वाहने नाहीत, सातारा जिल्ह्यात शेती
19
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
20
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे

भय्युजी महाराजांच्या उत्तराधिकाऱ्याबाबत निर्णय नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2018 6:08 AM

इंदोर  - भय्युजी महाराज यांनी संपत्तीचे आर्थिक अधिकार सेवेकरी विनायक दुधाडे यांना दिल्याचे समोर आल्यानंतर त्यांच्या ट्रस्टच्या एका पदाधिका-याने स्पष्ट केले आहे की, आर्थिक अधिकाराबाबत सद्या कोणताही निर्णय घेण्यात आला नाही.भय्युजी महाराज यांच्या सुसाइड नोटवरून हा मुद्दा समोर आला आहे. याबाबत बोलताना श्री सद्गुरु दत्त धार्मिक ट्रस्टचे सचिव तुषार पाटील म्हणाले ...

इंदोर  - भय्युजी महाराज यांनी संपत्तीचे आर्थिक अधिकार सेवेकरी विनायक दुधाडे यांना दिल्याचे समोर आल्यानंतर त्यांच्या ट्रस्टच्या एका पदाधिका-याने स्पष्ट केले आहे की, आर्थिक अधिकाराबाबत सद्या कोणताही निर्णय घेण्यात आला नाही.भय्युजी महाराज यांच्या सुसाइड नोटवरून हा मुद्दा समोर आला आहे. याबाबत बोलताना श्री सद्गुरु दत्त धार्मिक ट्रस्टचे सचिव तुषार पाटील म्हणाले की, आम्ही याबाबत काही विचार करण्याच्या मनस्थितीत सद्या नाहीत. त्यांनी संकेत दिले की, काही दिवसानंतर ट्रस्टची बैठक बोलावून याबाबत निर्णय घेतला जाईल.पाटील म्हणाले की, आम्ही बैठक घेऊन हे निश्चित करू की, महाराजांनी सुरू केलेल्या विविध योजना कशा प्रकारे पूर्ण करायच्या आहेत. त्यांनी सांगितले की, भय्युजी महाराज यांनी २१ मार्च १९९९ मध्ये स्थापन केलेल्या ट्रस्टमध्ये ११ ट्रस्टी आहेत. ही संस्था मध्यप्रदेश, महाराष्ट्र आणि अन्य राज्यात कृषि, जल संरक्षण आणि सामाजिक कार्यात काम करते.डॉ. आयुषी-कुहूमध्ये वादभय्युजी महाराज यांच्या पत्नी डॉ. आयुषी आणि त्यांच्या पहिल्या पत्नीची मुलगी कुहू यांच्यात वाद असल्याचे आता लपून राहिलेले नाही. विविध मुद्यांवर तपास करणाºया पोलिसांनी या प्रकरणात पत्नीसह ७ जणांचे जबाब घेतले आहेत. तसेच, कॉम्युटर, मोबाइल जप्त केले आहेत.मुलीला भेटायला चालले होते?सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भय्युजी महाराज हे सोमवारी मुलगी कुहू हिला भेटायला पुण्याला निघाले होते. मात्र, असे समजले की, कुहू मंगळवारी इंदोरला येत आहे. त्यामुळे ते वाटेतूनच परतले.नेमके कारण काय?मिळालेल्या माहितीनुसार, डॉ. आयुषी आणि मुलगी कुहू यांच्यात अबोला होता. त्यामुळेच महाराजांनी आपल्या दुसºया पत्नीला वेगळा फ्लॅट घेऊन दिला होता.आईसाठीही काहीच नाही?लोकांना याचे आश्चर्य वाटत आहे की, आर्थिक अधिकार कुटुंबातील व्यक्तीऐवजी विनायककडे कसे दिले? आपल्या वृद्ध आईच्या नावेही काहीच ठेवले नाही.दुस-या लग्नामुळे कुटुंब नाराजमहाराजांच्या काही निकटवर्तीय लोकांनी सांगितले की, कुटुंबातील काही लोक दुसºया लग्नामुळे खुश नव्हते.नर्मदा नदीत अस्थींचे विसर्जनभय्युजी महाराज यांच्या अस्थी गुरुवारी महेश्वर येथे नर्मदा नदीत विसर्जित करण्यात आल्या. देशातील प्रमुख नद्यांमध्ये अस्थी विसर्जन करण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

टॅग्स :Bhayyuji Maharajभय्यूजी महाराजnewsबातम्या